एवढ्या संपत्तीची मालकिण आहे बॉलीवूडची देसी गर्ल


बॉलीवूडची देसी गर्ल प्रियंका चोप्राने काल आपला 37 वा वाढदिवस साजरा केला. प्रियंकाचा बॉलिवूडच्या देसी गर्लपासून ते जोनस कुटुंबाची सून होण्यापर्यंतचा प्रवास थक्क करणारा आहे. प्रियंका जगभरातील अनेक मुलींसाठी आज एक आयकॉन आहे. सध्या ती तिच्या करिअरसोबत संसारही एन्जॉय करत आहे.

सोशल मीडियावर प्रियंका आणि निक जोनसचे अनेक फोटो आणि व्हिडिओ व्हायरल होत असतात. उत्तर प्रदेशमधील रायबरेली येथे प्रियंकाचा जन्म झाला. तिने 2000 मध्ये मिस वर्ल्ड स्पर्धा जिंकली. प्रियंकाने यानंतर बॉलिवूडमध्ये पदार्पण केले. तिचे नाव आज बॉलिवूडमधील नावाजलेल्या अभिनेत्रींमध्ये आवर्जुन घेतले जाते.

तिने बॉलिवूडमध्ये आपल्या अभिनय कौशल्याने आणि अथक मेहनतीने आपले स्थान तयार केले. तिने बॉलिवूडनंतर हॉलिवूडमध्ये एण्ट्री घेतली. 1 अब्ज 92 कोटी रुपये प्रियंकाची एकूण संपत्ती आहे. आम्ही आज तुम्हाला प्रियंकाकडे एकूण किती घर आणि गाड्या आहेत हे आज सांगणार आहोत.

मुंबईत प्रियंकाची अनेक घरे आहेत. प्रियंकाचे वर्सोवातील एका बिल्डिंगमध्ये तीन मोठी घरे आहेत. तसेच न्यूयॉर्कमध्ये पेन्ट हाउस आहे. तब्बल 30 कोटी रुपये या पेन्ट हाउसची किंमत आहे. याशिवाय मुंबई आणि गोव्यात तिच्या नावाने जमीनही आहे. मीडिया रिपोर्टनुसार, बागा बीचवरही तिचा एक बंगला आहे, ज्याची किंमत 20 कोटी रुपये आहे.

याशिवाय यारी रोडवर एक बंगला 2014 मध्ये प्रियंकाला विकत घ्यायचा होता. दरिया महल असे या बंगल्याचे नाव आहे. या बंगल्यासाठी प्रियंका 100 कोटी रुपये द्यायलाही तयार होती. पण ही डील काही कारणांमुळे होऊ शकली नाही. याशिवाय प्रियंका आणि निकने Beverley Hills वर एक घर विकत घेतले. 44 कोटी रुपये या घराची किंमत आहे.

प्रियंकाची डेटिंग अॅप बंबलमध्येही गुंतवणूक आहे. याशिवाय तिची स्वतःची पर्पल पेबल ही प्रोडक्शन कंपनीही आहे. फार कमी अभिनेत्रींकडे Rolls Royce Ghost ही कार असते. प्रियंकाकडे ही कार आहे. या कराची किंमत जवळपास 5 कोटी रुपये आहे. प्रियंकाने मुंबईच्या घरी ही कार ठेवली आहे. याशिवाय तिच्याकडे BMW 5 series, BMW 7 series, Audi Q7, Porsche Cayenne आणि दोन मर्सिडीज कार आहेत. प्रियंका आणि निकने नुकतीच Mercedes S 650 Maybach कार विकत घेतली.

प्रियंकाला कारशिवाय बाइकचेही वेड आहे. प्रियंकाने 2015 मध्ये गुलाबी रंगाची हार्ले डेविडसन बाइक विकत घेतली होती. व्हॅलेंटाइन डेला तिने ही बाइक स्वतःलाच गिफ्ट केली होती. प्रियंकाकडे सर्वात कमी किंमतीतले कपडेही 30 ते 50 हजार रुपयांच्या घरातले आहेत. प्रियंकाला महागड्या बॅग विकत घ्यायलाही आवडतात. प्रियंकाकडे Bottega Veneta, Tod’s आणि Fendi या ब्रँडचे 4 लाख रुपयांच्या बॅग आहेत.

Leave a Comment