सौदी अरेबियाला पळून गेलेल्या बलात्काराच्या आरोपीला केरळच्या डीसीपीने आणले उचलून


केरळच्या डीसीपी मेरिन जोसेफ यांनी अशी केस सोडवली आहे, ज्याच्याबद्दल त्यांचे सर्वच स्तरातून कौतूक केले जात आहे. एक व्यक्ती 13 वर्षांच्या मुलीवर बलात्कार करून सौदी अरेबियाला पळून गेला होता. कोल्लम पोलिस कमिशनर मेरिन जोसेफ रियाद या बलात्काराचा आरोपी सुनील कुमार भद्रनला पकडून घेऊन आल्या आहेत.  सुनील कुमार भद्रन हा सौदी अरेबियामध्ये कंस्ट्रक्शन वर्कर होता. तो 2017 मध्ये बलात्कारकरून पळून गेला होता. तेव्हापासूनच हा व्यक्ती केरळमध्ये वॉन्टेड आहे.

सुनील कुमार सुट्टयांमध्ये केरळला आला होता. त्या दरम्यान त्याने मित्राच्या 13 वर्षाच्या भाचीचे यौन शौषण केले. मुलीने ही माहिती कुटूंबाला सांगितल्यावर त्यांनी पोलिसात तक्रार दाखल केली. पोलिसांनी लुक आउट नोटिस जारी करे पर्यंत सुनील देश सोडून सौदीला पोहचला होता. त्यानंतर मुलीला कोल्लमच्या कारीडोड येथील सरकारी महिला मंदिरात रेस्क्यू होममध्ये पाठवण्यात आले. जून 2017 ला मुलीने आत्महत्या केली होती.

दोन वर्षानंतर जून 2019 मेरिन जोसेफ यांची कोल्लम येथे नियुक्ती झाल्यानंतर त्यांनी महिला व बालकांसंबंधी प्रलंबित केसची फाईल्स मागवली. तेव्हा त्यांना या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली. इंटरपोलने नोटिस काढले होते आणि प्रकरणामध्ये पुढे काहीच झाले नव्हते. त्यांना माहिती मिळाली की, लोकांमध्ये राग असून देखील या प्रकरणात काहीच झालेले नाही.

त्यांनी सांगितले की, मला या प्रकरणाबद्दल माहिती मिळाली की, आरोपी दोन वर्षांपासून फरार आहे. केरळ पोलिस आंतरराष्ट्रीय तपास एजेंसी सौदी अरेबिया पोलिसांबरोबर काम करत होते. आम्ही फक्त आणखी प्रयत्न केले.

मेरिन सौदी अरेबियाला पोहचल्या. तेथे कागदी कारवाई पुर्ण करत सुनीलला पकडून भारतात घेऊन आल्या. सुनील हा केरळमधील पहिला आरोपी आहे ज्याला गुन्ह्यासाठी प्रत्यर्पितकरून परत आणण्यात आला आहे.

Leave a Comment