जर्मनीतील या दाम्पत्याचा लग्नाच्या ७१ वर्षांनंतर एकाच दिवशी झाला मृत्यू


बर्लिन – ७१ वर्षांचे वैवाहिक जीवन आनंदात घालवल्यानंतर जर्मनीतील ९४ वर्षीय हर्बर्ट व ८८ वर्षांच्या मर्लिन फ्रान्सिस या दांपत्याने एकाच दिवशी या जगाचा निरोप घेतला. १२ तासांचा फरक दोघांच्या मृत्यूमध्ये होता. स्थानिक प्रसारमाध्यमांनुसार ७२ वर्षांपूर्वी एका कॅफेत दोघांची भेट झाली होती. हर्बर्ट हे त्या वेळी २२ वर्षांचे, तर मर्लिन १६ वर्षांच्या होत्या. वर्षभर डेटिंग करून दोघांनी लग्न केले. मर्लिन यांनी लग्नानंतर पतीसोबत जर्मनीत सहा वर्षे घालवली. तसेच दुसऱ्या महायुद्धात लष्कराची सेवाही केली होती. हर्बर्ट यांनी कोरिया व व्हिएतनाममध्येही नोकरी केली. दीर्घकाळ एकमेकांसोबत राहून दोघांचे गत शुक्रवारी निधन झाले. सोमवारी दोघांवर अंत्यसंस्कार करण्यात आले.

Leave a Comment