यापूर्वी देखील ‘या’ सहा अभिनेत्रींचे देखील इंटिमेट सीन झाले होते लीक


अभिनेत्री राधिका आपटेच्या आगामी चित्रपटातील एक इंटीमेट सीन काही दिवसांपूर्वी लीक झाला. सध्या सोशल मीडियात या सीनचे काही फोटो व्हायरल होत आहेत. जेव्हा राधिकाला ही गोष्ट कळली तेव्हा तिने लोकांच्या मानसिकतेवर प्रश्न उपस्थित केले. बाकीही अनेक चांगले सीन चित्रपटात आहेत, पण ते लीक न होता फक्त इंटीमेट सीनच लीक झाला. लोकांची मानसिकता यातून दिसते असे तिने म्हटले. तसेच देव पटेलही या सीनमध्ये आहे, पण त्याच्या नावाने नाही तर हा सीन माझ्याच नावाने व्हायरल होत आहे. पण आम्ही आज तुम्हाला फक्त राधिकाच नाही तर याआधीही अनेक अभिनेत्रींचे चित्रपटातील इंटीमेट सीन लीक झाल्याची माहिती देणार आहोत.

अभिनेत्री अहाना कुमराचा लिपस्टिक अण्डर माय बुर्खामधील इंटीमेट सीन लीक झाला होता. फक्त अहानाच नाही तर चित्रपटातील इतर अभिनेत्रींचे बोल्ड सीन लीक झाले होते. हा चित्रपट इंटीमेट सीन लीक झाल्यानंतर प्रदर्शनाच्याआधीच इंटरनेटवर लीक झाला होता.

नवाजुद्दीन सिद्दीकीच्या बाबूमोशाय बंदूकबाज या चित्रपटातील अभिनेत्री बिदिता बागचेही अनेक इंटीमेट सीन सोशल मीडियावर लीक झाले होते. प्रदर्शित होण्यापूर्वीच हा चित्रपट इंटरनेटवर लीक झाला होता.

अभिनेत्री स्वरा भास्करचा अनारकली ऑफ आरा चित्रपटातील एक इंटीमेट सीन लीक झाला होता. स्वरा यात आपले कपडे बदलताना दिसत होती. याच चित्रपटातील अजून एक बोल्ड सीनही लीक झाला होता.

रणदीप हुड्डा आणी नंदना सेन यांचा प्रसिद्ध चित्रकार राजा रवी वर्मा यांच्या आयुष्यावर बेतलेल्या रंगरसिया चित्रपटातील एक बोल्ड सीन सोशल मीडियावर व्हायरल झाला होता. चित्रपट या सीनमुळेच प्रचंड चर्चेत आला होता. चित्रपटातील अनेक बोल्ड सीनही या सीननंतर लीक झाले होते.

अभिनेत्री माही दिल आणि रणदीप हुड्डा यांचा साहेब बीवी और गँगस्टर चित्रपटातील इंटीमेट सीन लीक झाला होता. या सीननंतर चित्रपटातील अनेक सीन लीक झाले होते.

Leave a Comment