गंभीरने फोडला धोनीच्या नावाने टाहो


सध्याच्या घडीला क्रिकेट जगतात भारताचा यष्टीरक्षक व माजी कर्णधार कॅप्टन कुल अर्थात महेंद्रसिंग धोनीच्या निवृत्तीची चर्चा होत आहे. दरम्यान धोनी लगेच निवृत्ती घेणार नसल्याचेही म्हटले जात आहे. वेस्ट इंडीज दौऱ्यावर धोनी जाण्याची शक्यता कमी आहे. तसेच पुढच्या वर्षी होणाऱ्या टी-20 वर्ल्ड कपनंतर तो निवृत्ती घेईल अशीही चर्चा आहे.

अनेकांनी विश्वचषक स्पर्धेदरम्यान धोनीने केलेल्या संथ खेळीवर टीका केली होती. भारताचा माजी क्रिकेटपटू गौतम गंभीरने आता एक खळबळजनक खुलासा केला आहे. इंडिया टुडेशी बोलताना त्याने सांगितले की, 2012 मध्ये धोनीने ठरवले होते की मी, 2015 च्या वर्ल्ड कपमध्ये सचिन आणि सेहवाग खेळणार नाही. त्याने त्याशिवाय ऑस्ट्रेलिया दौऱ्यावरसुद्धा जाहीर केले होते की तो प्लेइंग इलेव्हनमध्ये एकाचवेळी सचिन, गंभीर आणि सेहवाग यांना संधी देणार नाही.

गंभीरने म्हटले की, 2012 मध्ये धोनीला सचिन, सेहवाग आणि गंभीर यांना एकाचवेळी प्लेइंग इलेवनमध्ये घ्यायचे नव्हते. यामागे धोनीने कारण सांगताना त्यांचे क्षेत्ररक्षण चांगले नसल्याचे म्हटले होते. गंभीर म्हणाला की धोनीचे हे म्हणणे धक्कादायक होते. तीन वर्ष आधी तुम्हाला पुढचा वर्ल्ड कप खेळता येणार नाही असे कोणाला सांगितल्याचे मी कधीच ऐकले नव्हते.

आता धोनीच्या पलिकडे पाहण्याची गरज आहे. जेव्हा धोनी कर्णधार होता तेव्हा तो भविष्याकडे बघत होता. स्वत: धोनीने नव्या खेळाडूंवर विश्वास ठेवला होता. त्याने प्रॅक्टिकल निर्णय घेतले होते असेही गंभीरने सांगितले. धोनीची जागा कोण घेणार याची चर्चा सध्या सुरू आहे. त्याबद्दल बोलताना गंभीरने ऋषभ पंत, संजु सॅमसन, इशान किशन यांचे नाव घेतले. या खेळाडूंना एक दीड वर्ष मिळायला हवे. त्यांची कामगिरी पाहून संधी दिली पाहिजे असे गंभीर म्हणाला.

Leave a Comment