फेसअॅप वापरणाऱ्यांची प्रायव्हसी धोक्यात !


फेस अॅपच्या माध्यमातून सध्या प्रत्येकजण सोशल मीडियावर आपण वृद्ध झाल्यावर कसे दिसेल याचे फोटो शेअर करत आहेत. 2017 मध्ये लॉन्च झालेल्या या अॅपची सध्या जोरदार चर्चा सुरू आहे. ओल्ड एज हा फिल्टर वापरून क्रिकेटपटू, कलाकार सर्वच सेलिब्रिटी फोटो शेअर करत आहेत.

वय वाढलेले दिसणारे तरुण सेलिब्रिटींचे फोटो सोशल मीडियावर व्हायरल होत आहेत. या अॅपच्या प्रायव्हसीवरून आता प्रश्न उपस्थित केले जात आहेत. म्हातारे झाल्यावर कसे दिसतील हे दाखवण्यासाठी लोक न्यूरल नेटवर्कचा वापर करते आहेत.

एका महिलेने ट्विटरवर ट्विट करून म्हटले आहे की, तुम्हीसुद्धा वय वाढलेले फोटो जर तयार करत असाल तर त्या अॅपला तुमचे फोटो, नाव, युजरनेम यासह तुम्हाला काय आवडते या गोष्टींची माहिती वापरण्याची परवानगी देता. तिने याचा पुरावा देत अॅपचे पॉलिसी पेज शेअर केले आहे.

या अॅपमुळे प्रायव्हसी धोक्यात आल्याचे आयओएस युजर्सनीसुद्धा म्हटले आहे. सेटींगमध्ये Allow FaceApp to Access मध्ये Photos Never असे सेट केल्यानंतरही फोनधील फोटो अॅपला अॅक्सेस करता येतात. 10 कोटी लोकांनी आतापर्यंत फेसअॅप डाऊनलोड केले आहे. सध्या सोशल मीडियात भारतीय संघातील खेळाडूंचासुद्धा वय वाढलेला फोटो व्हायरल होत आहे. अनेकांनी हा भारताचा 2050 मधील संघ असल्याचे म्हटले आहे.

Leave a Comment