एवढा किंमतीची आहे आलिया भट्टची पर्स!


आपल्या अनोख्या स्वॅगसाठी बॉलिवूड सेलिब्रेटी ओळखले जातात. ते नेहमीच त्यांच्या महागड्या गोष्टी खरेदी करण्याच्या आवडीमुळे चर्चेत असतात. प्रत्येकालाच महागड्या गोष्टी घेऊन त्या फ्लॉन्ट करायला आवडते. आलिया भट्टही याला काही अपवाद नाही. तिला नुकतेच तिच्या सर्वात महागड्या बॅगसोबत एअरपोर्टवर फिरताना पाहण्यात आले.

जेव्हा तुम्हाला या बॅगेची किंमत कळेल, तेव्हा तुम्हीही तुमच्या कपाळावर हात मारल्याशिवाय राहणार नाही. तब्बल 1 लाख 61 हजार 43 रुपये आलियाच्या या ब्रँडेड बॅगेची किंमत आहे. आलियाने ही बॅग पर्पल ट्रॅक सूटवर घेतली होती. तिचा एकंदरीत अटायरच फार खुलून दिसत होता.

‘सडक २’ चित्रपटाच्या चित्रीकरणासाठी आलिया तिच्या आईसोबत ऊटीला जात होती. तिला यावेळी एअरपोर्टवर स्पॉट करण्यात आले. ‘सडक २’ चे पहिले शेड्यूल पूर्ण झाले असून ती दुसऱ्या शेड्यूलसाठी ऊटीला रवाना झाली. या चित्रपटाव्यतिरिक्त संजय लीला भन्साळी यांच्या ‘इन्शाअल्लाह’ चित्रपटात आलिया दिसणार आहे.

सलमान खान आणि आलिया भट्ट या चित्रपटातून पहिल्यांदा एकत्र काम करणार आहेत. सलमान ‘हम दिल दे चुके सनम’ चित्रपटानंतर भन्साळी यांच्यासोबत काम करणार आहे. हा चित्रपट त्यामुळे तिघांसाठीही फार खास असणार आहे यात काही शंका नाही. आलियाने नुकतेच अयान मुखर्जीच्या ‘ब्रह्मास्त्र’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले. ती यात प्रियकर रणबीर कपूर आणि बॉलिवूडचे शहेनशहा अमिताभ बच्चन यांच्यासोबत दिसणार आहे.

Leave a Comment