तुम्ही पाहिला आहे का उदयनराजेंचा भन्नाट डान्स


आपल्या मस्तमौजी, खिलाडू वृत्तीमुळे खासदार उदयनराजे भोसले हे खूप लोकप्रिय आहेत. त्यांचे साताऱ्यात तर अनेक डायलॉग प्रसिद्ध आहेत. आता सोशल मीडियावर उदयनराजेंचा एक व्हिडीओ व्हायरल होत आहे. ते यामध्ये चक्क ‘प्यार का तोहफा तेरा’ गाण्यावर नाचताना दिसत आहे. टिकटॉक (TikTok) वर हा व्हिडीओ त्यांच्या एका चाहत्याने अपलोड केला होता. हा व्हिडीओ आता चांगलाच व्हायरल झाला आहे. याबाबतचे वृत्त लोकमत न्यूज 18 ने देऊन व्हिडीओही जारी केला आहे.

काही दिवसांपूर्वीचा हा व्हिडीओ असून उदयनराजे भोसले यात डोक्यावर पांढरी टोपी घालून ‘प्यार का तोहफा तेरा’ या गाण्यावर थिरकताना दिसत आहेत. चाहत्यांनी आणि उपस्थित जमावानेही त्यांच्या ठेक्याला चांगलाच प्रतिसाद दिला आहे. तोहफा या चित्रपटातील हे गाणे असून, जितेंद्र आणि जयाप्रदा यांच्यावर ते चित्रित करण्यात आले होते. या गाण्यातील नृत्यशैलीमुळे ते त्यावेळी खूप लोकप्रिय ठरले होते. आता पुन्हा उदयनराजेंमुळे हे गाणे चर्चेत आले आहे.

व्हिडीओ पाहण्यासाठी या लिंकवर क्लिक करा

दरम्यान, संगीताची उदयनराजे भोसले यांना आवड आहे हे आपण अनेक मुलाखतींमध्ये, भाषणांमध्ये पाहिले आहे. त्यांनी अनेक मुलाखतींमध्ये गाणी गावून आपली चित्रपटाची आवड प्रदर्शित केली आहे. त्यांनी ‘आता माझी सटकली’ या संवादालाही वेगळ्या उंचीवर नेवून ठेवले होते. आता त्यांच्या या नव्या व्हिडीओने त्यांची नृत्याची शैलीही पहायला मिळाली आहे.

Leave a Comment