दिवसेंदिवस वाढत आहे या नव्या खासदारी बाईंची लोकप्रियता


लोकसभेत खासदार म्हणून बंगाली अभिनेत्री नुसरत जहाँ निवडून आल्यापासून संसदेतील त्यांच्या वावरावर सर्वांचे लक्ष आहे. संसदेत त्या पहिल्यांदा नवविवाहितेच्या आभूषणांसह दाखल झाल्या.

भांगात नुसरत यांनी सिंदूर भरलेला होता आणि गळ्यात मंगळसूत्रही घातलेले होते. त्यांना यावरून मुस्लीम समाजातील काही घटकांनी लक्ष्य केले. पण धर्मनिरपेक्षता आपण मानतो, असे नुसरत यांनी उत्तर दिले.

नुसरत यांनी जूनच्या पहिल्या आठवण्यात उद्योगपती निखिल जैन यांच्याबरोबर लग्न केले. त्यांनी संसदेच्या बजेट सेशनमध्ये भाषणसुद्धा केले.

संसदेत नुसरात जहाँ आणि मिमी चक्रवर्ती या दोन्ही बंगाली अभिनेत्री पहिल्या दिवसापासूनच लक्ष वेधून घेत आहेत. जून 25 ला नवनिर्वाचित खासदार म्हणून संसदेत दाखल झाल्यावर नुसरत जहाँ यांनी शपथ घेतल्यानंतर वंदे मातरम् असेही म्हटले.

तृणमूल काँग्रेसच्या नुसरत आणि मिमी चक्रवर्ती दोघी खासदार आहेत. संसदेच्या आवारात जीन्समध्ये दाखल झाल्या त्यावरून दोघींना ट्रोल केले गेले होते.

Leave a Comment