नदीवर तरंगणाऱ्या हॉटेलेची निर्मिती होण्यापूर्वीच बुकिंग सुरू


तरंगणारे हॉटेल स्वीडनमधल्या लॅपलँडमध्ये एक नदीवर तयार होत आहे. 75 हजार रुपये या हॉटेलमध्ये राहायचे असेल तर एका दिवसाला मोजावे लागतील.

अनेक प्रकारच्या हॉटेलमध्ये, हाऊसबोटमध्ये तुम्ही राहिला असाल पण जर हे हॉटेलच नदीवर तरंगत असेल तर तो किती मस्त अनुभव असेल याची कल्पना करा.

लोक ल्यूल नदीमध्ये तरंगणाऱ्या या हॉटेलमध्ये राहण्यासाठी खूपच अधीर झाले आहेत. 2020 मध्ये किंवा 2021 मध्ये बांधून हे हॉटेल पूर्ण होईल पण आत्तापासूनच पर्यटकांनी याचे बुकिंग सुरू केले आहे.

815 पौंड स्वीडनमधील या हॉटलमध्ये राहण्यासाठी दिवसाला मोजावे लागतील. भारतीय रुपयांमध्ये याची किंमत 75 हजार रुपये आहे.या हॉटेलची खासियत म्हणजे ते उन्हाळ्यात नदीवर तरंगेल आणि नदी गोठली की गोठून जाईल. स्पा सेंटर, वेलनेस थीम हे सगळे या हॉटेलमध्ये असेल. येथे राहणाऱ्या पर्यटकांना व्यायाम, आहार, मन:शांती या सगळ्यासाठी विशेष थेरपी दिली जाईल.

Leave a Comment