सोशल मीडियात व्हायरल होत आहेत प्रियंकाच्या भावजयीच्या हनिमूनचे फोटो


फ्रान्समध्ये राजेशाही थाटात सोफी टर्नर आणि जो जोनस लग्न केले. त्यानंतर ते आता मालदीवमध्ये हनिमूनसाठी गेले आहेत. सोशल मीडियावर दोघांनी त्यांच्या हनीमूनचे काही फोटो आणि व्हिडिओ शेअर केले.

View this post on Instagram

🇫🇷 me 😏

A post shared by J O E J O N A S (@joejonas) on


जो आणि सोफी व्हायरल होत असलेल्या या फोटोंमध्ये समुद्र किनारी निसर्ग सौंदर्याचा आनंद घेताना दिसत आहेत. 1 मे रोजी कोणालाही न सांगता दोघांनी लास वेगासमध्ये लग्न केल्यानंतर दोघांनी 30 जून रोजी खिश्चन पद्धतीने फ्रान्समध्ये मोजक्या लोकांच्या उपस्थितीत लग्न केले.

जो आणि सोफीचा हा दुसरा हनीमून आहे. लास वेगास येथील पहिल्या लग्नानंतर दोघे कॅलिफोर्नियात फिरायला गेले होते. सोफीने शेअर केलेल्या फोटोत तिने फिकट गुलाबी रंगाची मोनोकनी घातली आहे. या मोनोकनीमध्ये ती फार सुंदर दिसत होती. दोघांच्या बॉण्डिंगवर त्यांचे अनेक चाहते फिदा आहेत. कपल असावे तर असेच अशाच प्रतिक्रिया अनेकदा जो आणि सोफीला मिळत असतात.


या दोघांची लव्हस्टोरी तेव्हा चर्चेत आली होती जेव्हा दोघांना नोव्हेंबर 2016 मध्ये प्री- एमटीव्ही युरोप म्युझिक अवॉर्ड्स कार्यक्रमात एकत्र पाहण्यात आले होते. यानंतर सोफी टर्नर आणि जो जोनसने 20178 च्या जानेवारीमध्ये इन्स्टाग्रामवर आपले नाते अधिकृतरित्या मान्य केले. तर त्यांनी ऑक्टोबर 2017 मध्ये साखरपुडा केला.

View this post on Instagram

Mr and Mrs Jonas Photo by @corbingurkin

A post shared by Sophie Turner (@sophiet) on


दोघांनी गेल्या महिन्यात फ्रान्समधील Chateau de Torreau किल्ल्यात लग्न केले. सोफीने लग्नात पांढऱ्या रंगाचा गाउन घातला होता. मीडिया रिपोर्टनुसार, सोफीचा हा गाउन तयार करायला तब्बल 1 हजार 50 तास लागले होते.

Leave a Comment