
बॉंड सिरीज २५ मध्ये ब्रिटीश सिक्रेट एजंट 007 च्या भूमिकेत डॅनियल क्रेग नसेल तर या भूमिकेत महिला कलाकार दिसू शकते असे डेली मेलच्या बातमीत म्हटले आहे. डॅनियल क्रेग ऐवजी या चित्रपटात 007 एजंट म्हणून लशाना लिंच ही अभिनेत्री दिसेल असे संकेत मिळाले आहेत. लशानाने कॅप्टन मार्व्हल मध्ये फायटर पायलट मारियाची भूमिका साकारली होती आणि त्या भूमिकेने ती एकदम प्रसिद्धीच्या झोतात आली आहे.
बॉंड २५ मध्ये 007 एजंट साकारणार महिला कलाकार

या चित्रपटाची कथा लिक झाली आहे. सध्याचा बॉंड डॅनियल क्रेग गुप्तचर संस्था एम १६ सोडतो आणि जमेका मध्ये तो राहतो आहे. एका शत्रूशी लढण्यासाठी त्याला परत बोलावले जाते. तो परत येतो तेव्हा त्याची ओळख 007 कोड नेमच्या नव्या एजंट बरोबर करून दिली जाते.
या चित्रपटाचे शुटींग बराच काळ रेंगाळले होते. तेव्हा क्रेगने २०१५ मध्येच पुन्हा 007 बॉंड साकारण्याऐवजी मनगटाची नस कापून घेणे पसंत करेन असे वक्तव्य केले होते.
