आयपॅड ने कंट्रोल होणारा सुपर याट विक्रीला


शिपिंग मॅग्नेट नावाने प्रसिद्ध असलेला अब्जाधीश अँटो मार्डन त्याचा अलिशान आणि अतिशय महागडा सुपर याट विकणार आहे. हा सुपर याट आयपॅडच्या सहाय्याने १६४ फुट रेंजने कंट्रोल करता येतो. मार्डन याने हा याट २०१३ साली खरेदी केला होता तेव्हा त्याची किंमत १०० कोटी होती असे सांगितले जात आहे. मार्डन आणि त्याच्या पत्नीने या याट मधून जगप्रवास केला आहे आणि सात वर्षे वापरल्यावर आता इतर लोकांनी या याट मधून प्रवासाचा आनंद लुटावा अशी त्यांची इच्छा आहे. त्यामुळे तो विकला जाणार आहे. अॅडस्ट्रा असे या याटचे नामकरण केले गेले आहे.

या सुपरयाट च्या विक्रीसाठी स्वतंत्र वेबसाईट सुरु केली गेली आहे. अर्थात त्यात किमतीचा खुलासा केला गेलेला नाही मात्र मिडिया रिपोर्ट नुसार तो किमान १२ दशलक्ष डॉलर्सन विकला जाईल. या १४० फुटी ट्रीमरन सुपर याटमध्ये एरोडायनामिक्स विंग्सचा वापर केला गेला असून त्यामुळे त्याला वेग मिळतो. यात वापरली गेलेली ग्लास नेहमीच्या ग्लासच्या तुलनेत २० टक्के हलकी आहे आणि पारंपारिक याटपेक्षा याला ८६ टक्के कमी इंधन लागते. याचा २० टक्के भाग पाण्याखाली असतो.

या याटमध्ये पाच बेडरूम, चार बाथरूम, ओपन स्काय बिअर बार आणि अन्य सोयी सुविधा आहेत. यात एकावेळी ९ पाहुणे आणि ६ क्रू मेम्बर प्रवास करू शकतात. २०१३ मध्ये हा तयार झाला तेव्हाच त्याला डिझाईन, वर्ल्ड सुपर याट आणि मोस्ट इनोव्हेटिव्ह डिझाईन असे तीन पुरस्कार मिळाले होते.

Leave a Comment