कुत्र्याने खाल्ला चमचा, शस्त्रक्रियेसाठी कोट्यवधी रुपयांचा खर्च


घरातील पाळीव कुत्रे कधी काय खाईल याचा नेम नसतो. आजवर, घरातील पाळीव श्वानांनी स्टेपलर, चमचे, खिळे, पैसे, फोनचा चार्जर अश्या इतक्या चित्रविचित्र वस्तू खाल्ल्या, की त्यांना सांभाळणाऱ्या श्वान प्रेमींच्या नाकी नऊ आल्याचे अनके किस्से प्रसिद्ध होत असतात. एबीसी न्यूज या वृत्तवाहिनीने प्रसिद्ध केलेल्या वृत्तानुसार बुगी नामक श्वानाला औषध दिले जात असताना औषधाच्या सोबत चमचा ही त्याने गिळून टाकला. हा चमचा बुगीच्या घश्यामध्ये असा काही अडकला, की शस्त्रक्रिया करण्याची वेळ आली. चमचा काढण्यासाठी केल्या गेलेल्या शस्त्रक्रियेसाठी बुगीच्या मालकाने पाच मिलियन डॉलर्स खर्च केले ! सुदैवाने बुगीची शस्त्रक्रिया यशस्वी झाली.

लुसिनो नामक श्वानाची तब्येत एके दिवशी अचानक बिघडली. एकाएकी तब्येत अशी का बिघडावी हे लुसिनोच्या मालकिणीला समजेना. तिने त्वरेने लुसिनो सहित पशुचिकित्सालायामध्ये धाव घेतली. लुसिनोच्या पोटाचा एक्सरे केला गेला असता, त्याने आपल्या मालकिणीची हजारो डॉलर्स किंमतीची हिऱ्यांची अंगठी गिळली असल्याचे निष्पन्न झाले. ही अंगठी लुसिनोच्या पोटातून बाहेर काढण्यासाठी केल्या गेलेल्या शस्त्रक्रियेसाठी त्याच्या मालकिणीला हजारो डॉलर्स खर्च करावे लागले. सुदैवाने शस्त्रक्रिया यशस्वी होऊन लुसिनोचे प्राण वाचले आणि मालकिणीलाही तिची अंगठी परत मिळाली !

न्यूयॉर्कचा निवासी श्वान फ्रेड याने एकदा द्राक्षे खाल्ली असता, त्याला त्यामुळे भयंकर अॅलर्जी होऊन फ्रेडच्या जीवाला धोका उत्पन्न झाला. सुदैवाने त्याच्यावर त्वरित उपचार केल्याने धोका टळला, तेवढ्यात त्याने कुठले तरी चॉकोलेट खाल्ले. औषधांच्या प्रभावाने कमी झालेली अॅलर्जी पुन्हा उफाळून आली, आणि पुन्हा एकदा आणीबाणीचा प्रंसग उभा राहिला. सुदैवाने याही वेळी योग्य उपचार मिळाल्याने फ्रेडचे प्राण वाचले. पण इतक्या वस्तू कमी म्हणून की काय, थोडेसे हिंडू फिरू लागताच फ्रेडने चक्क डिंकाची बाटली आणि त्यापाठोपाठ मोबाईलचा चार्जर गिळला. आता मात्र हतबल झालेल्या फ्रेडच्या मालकाला शस्त्रक्रियेशिवाय इतर कोणताही उपाय नसल्याचे पशुवैद्यक तज्ञांनी सांगितले आणि या शस्त्रक्रीयेपायी फ्रेडच्या मालकाला तब्बल अडीच लाख डॉलर्स खर्च करावे लागले!

Leave a Comment