बिहारचा हा वैज्ञानिक नासासाठी करणार सूर्यावर करणार संशोधन


भागलपूर – जगातील सर्वात अद्यावत अंतराळ संशोधन संस्था नासाचे बिहारच्या भागलपूर येथे राहणाऱ्या एका तरुण वैज्ञानिकाला निमंत्रण आले आहे. या युवकाचे नाव गोपाल असे असून आपल्या नवीन प्रकल्पात नासाने त्याची मदत मागितली आहे. गोपनियम अलॉय असे या प्रकल्पाचे नाव आहे. या प्रकल्पासाठी गोपालने आधीच नासाशी संपर्क साधला होता. आता या प्रकल्पात गोपाल नासाची मदत करणार आहे. गोपनियम अलॉय प्रकल्प यशस्वी ठरल्यास सूर्यावर संशोधन करणे सोपे होणार आहे. गोपनियम अलॉय हाफनियम, टेन्टिलुनियम, कार्बन आणि नायट्रोजनचे मिश्रण आहे. गोपालला ही संकल्पना एका हॉलिवूड पटावरून सूचली होती.

गोपाल सध्या देहराडूनच्या ग्राफिक एरा विद्यापीठातील प्रयोगशाळेत काम करत आहे. त्याने याबाबत सांगितल्याप्रमाणे, केळीच्या खोडापासून वीज निर्मिती करणे सोपे आहे. केळीच्या खोडात यासाठी दोन इलेक्ट्रोड लावावे लागतात. बाजारात हे सहज उपलब्ध होऊ शकतात. वीजेचे तार दोन्ही इलेक्ट्रोडमधून जोडून त्यांना बल्बाशी कनेक्ट केल्यानंतर बल्ब पेटतो. केळीच्या खोडापासून आता सॅनिटेरी नॅपकीन, बॅन्डेज, यूरिया, बेबी नॅपकीन बनवण्यावर संशोधन सुद्धा सुरू आहेत. या संशोधनासाठी गोपाल यांनी 2018 मध्ये पेटंट मिळवला आहे. ‘पेपर बायो सेल’ आणि ‘बनाना बायो सेल’ यांचा त्यांनी शोध लावल्यानंतर 4 वर्षांसाठी भारत सरकारसोबत करार केला आहे. केवळ एकच वर्ष त्या कराराला झाले आहे.

Leave a Comment