लिव्ह इन रिलेशनमध्ये राहणाऱ्या 278 जोडप्यांचे लावून दिले लग्न


रांची (झारखंड) – 351 जोडप्यांचे सामाजिक आणि धार्मिक संस्था एमआरएस श्रीकृष्ण प्रणामी सेवा धाम ट्रस्ट आणि स्वामी सदानंद प्रणामी चॅरिटेबल ट्रस्टने लग्न लावून दिले आहे. 278 जोडे मारवाडी भवनात आयोजित सामुहिक आदर्श विवाह कार्यक्रमात असे होते, जे मागील अनेक वर्षांपासून लिव्ह इन रिलेशनमध्ये राहत आहेत. यातील सात नववधू गरोदर होत्या.

स्वामी सदानंद प्रणामी या जोडप्यांना आशीर्वाद देण्यासाठी लग्न सोहळ्यात उपस्थित होते. ते म्हणाले झारखंडमधील आदिवासी आणि मागासवर्गीय समाजातील लोक गरिबीमुळे आणि पैशांमुळे वेळेवर आपल्या मुलींचे लग्न लावून देऊ शकत नसल्यामुळेच लिव्ह इन रिलेशनमध्ये राहण्यास हजारो तरुण-तरुणी मजबूर आहेत. यामुळे अनेकांचे लग्नाचे वय निघून जाते. हा प्रयत्न आदिवासी संस्कृती वाचावी आणि बाहेरील लोक याचा गैरफायदा घेऊ नयेत, यामुळेच केला जात आहे.

Leave a Comment