‘या’ अभिनेत्रीला साकारायची आहे मिताली राजची व्यक्तिरेखा


आतापर्यंत बॉलिवूडमध्ये वेगवेगळ्या क्षेत्रात नाव कमवणाऱ्या अनेक व्यक्तींवर आधारित बोयपिक आले आहेत. महेंदसिंह धोनी, सचिन तेंडुलकर आणि आता कपिल देव यांचाही यात समावेश झाला आहे. या पाठोपाठ महिला क्रिकेट संघाची कर्णधार मिताली राज हिच्या बायोपिकचीही सध्या जोरदार चर्चा होत आहे.

मुंबईतील एका रेडिओ स्टेशनकडून आयोजित करण्यात आलेल्या कार्यक्रमात नुकतीच अभिनेत्री तापसी पन्नूने हजेरी लावली होती. तिने यावेळी आपल्या चाहत्यांसोबत संवाद साधला. तिला या बायोपिकबद्दल यावेळी विचारले असता, मिताली राजवर बायोपिक बनवणाऱ्या निर्मात्यासोबत तुमच्यापैकी कोणाची ओळख असेल, तर माझे नाव त्यांना नक्की सुचवा. कारण तिच्या बायोपिकमध्ये काम करण्याची मला खूप इच्छा असल्याचे तापसीने म्हटले आहे.

दरम्यान तापसी काही दिवसांपूर्वीच ‘बदला’ आणि ‘गेम ओव्हर’सारख्या चित्रपटांतून प्रेक्षकांच्या भेटीला आली होती. नुकतेच तिने ‘सांड की आँख’ चित्रपटाचे चित्रीकरण पूर्ण केले असून ती यात भूमी पेडणेकरसोबत स्क्रीन शेअर करताना दिसणार आहे. पण मिताली राजच्या बायोपिकमध्ये आता तापसीची वर्णी लागणार का? हे आगामी काळाच ठरवेल.

Leave a Comment