पहिल्याच चित्रपटात सुपरस्टार आणि नंतर सुपरफ्लॉप


हिंदीसिनेसृष्टी एका मृगजळापेक्षा कमी नाही, असे म्हटले तर वावगे ठरु नये. कारण येथे कोणाचे नशीब कधी फळफळेल याचे काही सांगता येत नाही. या चमचमते दुनियेमुळे अनेक ग्लॅमर आणि स्टारडम मिळते. त्यातच काही जणांचे नशीब पहिल्याच चित्रपटात फळफळते, तर काहींना भरपूर संघर्ष करावा लागतो. पण आज आम्ही तुम्हाला अशा काही कलाकारांबाबत सांगणार आहोत, ज्यांनी पदार्पणातच यशाला गवसणी घातली, पण त्यानंतर त्यांच्या पदरी मात्र निराशा आली. चला तर मग जाणून घेऊयात त्या कलाकारांबाबत…

वयाच्या २२ व्या वर्षी ‘आशिकी’ चित्रपटातून अभिनेता राहुल रॉयने बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. बॉक्स ऑफिसवर त्याचा पहिलाच चित्रपट तुफान गाजला. पण त्यानंतर त्याच्या चित्रपटांना म्हणावी तशी प्रसिद्धी मिळाली नाही. तो त्यामुळे सध्यातरी लाईमलाईटपासून दुर झाला आहे.

‘कहो ना प्यार है’ चित्रपटाद्वारे अमिषा पटेल हिने हृतिक रोशनसोबत बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. तिचादेखील हा पहिलाच चित्रपट बॉक्स ऑफिसवर तुफान गाजला. २००१ मध्येही तिने त्यानंतर ‘गदर’ चित्रपटात भूमिका साकारली होती. त्यावेळी ‘गदर’ चित्रपटानेही बरेच विक्रम रचले होते. पण त्यानंतर तिचे स्टारडम कमी झाले. आता प्रसिद्धीझोतात राहण्यासाठी ती बोल्ड फोटोशूटचा आधार घेते. ती यावरुन सोशल मीडियात ट्रोलही होते.

अभिनेत्री अनु अग्रवालची ‘आशिकी गर्ल’ म्हणून ओळख होती. राहुल रॉयसोबत तिनेही ‘आशिकी’ चित्रपटाद्वारे बॉलिवूडमध्ये पदार्पण केले होते. एका रात्रीत ती देखील स्टार बनली होती. असे असले, तरी पुढे ९ वर्षांपर्यंत चित्रपट मिळविण्यासाठी तिला अथक प्रयत्न करावे लागले. पुढे तिचे पूर्ण आयुष्यच एका अपघातामुळे बदलले. तिला या अपघातामुळे स्मृतीभ्रंश झाल्यामुळे तिच्या स्टारडमवर याचा फार परिणाम झाला.

सिनेसृष्टीत एका रात्रीत सुप्रसिद्ध अभिनेते राजेन्द कुमार यांचा मुलगा गौरव हा देखील सुपरस्टार बनला होता. ‘लव्ह स्टोरी’ हा त्याचा पहिलाच चित्रपट खूप गाजला होता. त्याचा त्यावेळी आघाडीच्या अभिनेत्यांमध्ये समावेश झाला होता. तरुणाईमध्ये त्याची स्टाईलही हिट झाली होती. पुढे त्याच्या चित्रपटांना फारसे यश न मिळाल्यामुळे तो सिनेसृष्टीपासून दुर झाला.

अभिनेत्री भाग्यश्रीची ‘मैने प्यार किया’ चित्रपटातील भूमिकेमुळे मोठ्या प्रमाणात लोकप्रियता वाढली होती. चित्रपटातील सलमान खान आणि तिची केमेस्ट्री चाहत्यांच्या पसंतीस उतरली होती. तिला आजही याच चित्रपटामुळे ओळखले जाते. पण भाग्यश्रीचे करिअर लग्नानंतर संपृष्टात आले.

सलमान खानला देखील अलिकडेच स्टारडम विषयी प्रश्न विचारण्यात आला होता, की स्टारडम गमावण्याची भीती त्याला वाटते का? त्याने यावर उत्तर दिले होते की ‘एक ना एक दिवशी तर हे स्टारडम जाणारच आहे. पण हे स्टारडम वर्षानुवर्षे टिकवणे एक आव्हान असते. शाहरुख, आमिर, अक्षय आणि अजय यांसारखे स्टार आपले स्टारडम बरीच वर्ष टिकवून ठेवू शकतात.

Leave a Comment