कतरिनाच्या बिकीनी अवताराने सोशल मीडिया धूमशान


सध्या मॅक्सिकोमध्ये बॉलिवूड अभिनेत्री कतरिना कैफ सुट्ट्यांचा आनंद लुटत आहे. तिने सोशल मीडियावर आपल्या वेकेशनचे काही फोटो शेअरही केले. यातही सध्या तिचा मल्टी कलर बिकीनीमधील एक फोटो व्हायरल होत आहे.

View this post on Instagram

🦋

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


कतरिनाचा हा फोटो पाहून तिचे कौतुक केल्याशिवाय चाहते राहत नाही. त्याचबरोबर अनेक सेलिब्रिटींनी तिच्या सौंदर्याचे भरभरून कौतुक केले आहे.
तिच्या फोटोवर कमेंट करताना मनिष मल्होत्राने दोन हार्टचे इमोजी शेअर केले. तर तिला फराह खानने ‘चक्क तू 12 वर्षांची मुलगी वाटतेस,’ असे लिहिले आहे. तर दिग्दर्शिका झोया अख्तरने लिहिले की, नेहमीच आनंदी मुली सुंदर दिसतात, अशी कमेंट केली.

View this post on Instagram

💙💚💛

A post shared by Katrina Kaif (@katrinakaif) on


त्यातच एका चाहत्याने असे लिहिले आहे की, मॅडम तुमचे स्मित हास्य पाहून माझा पूर्ण दिवस सुंदर जातो. तर नगहमने लिहिले की, नेहमी तू अशीच आनंदी रहा. हे हसू तुझ्या चेहऱ्यावर नेहमीच सुंदर दिसते.

Leave a Comment