भाजप आमदाराचे मुस्लिमांबद्दल वादग्रस्त वक्तव्य


वाराणसी – पुन्हा एकदा आपल्या वादग्रस्त वक्तव्यामुळे उत्तर प्रदेशातील बैरिया भाजप आमदार सुरेंद्र सिंह चर्चेत आले आहेत. सुरेंद्र सिंह यांनी मुस्लिस समुदायावर केलेल्या टीकेमुळे आता नवा वाद निर्माण होण्याची शक्यता आहे. 50 बायका मुस्लिमांमध्ये केल्या जातात त्यामुळे त्यांना 1050 मुले होतात. ही परंपरा नसून प्राण्यांची वृत्ती असल्याचे वक्तव्य भाजप आमदार सुरेंद्र सिंह यांनी केले आहे.

पहिल्यांदाच असे वक्तव्य सुरेंद्र सिंह यांनी केलेले नाही. सुरेंद्र सिंह हे यापूर्वीही अनेकदा विविध वादग्रस्त वक्तव्य केल्यामुळे चर्चेत आले आहेत. सुरेंद्र सिंह यांनी निवडणुकीच्या दरम्यान मायावती यांच्यावर टीका करताना पातळी सोडून शब्द प्रयोग केले होते. मायावती रोज फेशियल करतात. त्या 60 वर्षाच्या असूनही आपण आजही असल्याचे दाखविण्याचा प्रयत्न करतात, असे त्यांनी म्हटले होते.

तर इस्लाम विरुद्ध भगवान अशी 2019 ची निवडणूक होणार आहे. राष्ट्रविरोधी विरोधी पक्ष आहेत. भारताच्या नागरिकांनी या निवडणुकीत निर्णय घ्यायचा आहे की इस्लाम जिंकणार की देव जिंकणार असे सुरेंद्र सिंह यांनी म्हटले होते. तसेच आमदार सुरेंद्र सिंह यांनी एका बलात्काराच्या प्रकरणातही मनोवैज्ञानिकांच्या नजरेतून पाहिले तर तीन मुलांच्या आईसोबत कोणी अश्लिल कृत्य करेल का? आमदार कुलदीप सेंगर यांच्यावर झालेल्या बलात्काराच्या आरोपावर ते बोलत होते. यामध्ये पीडित महिलेची नार्को टेस्ट करावी अशी मागणी त्यांनी केली होती.

Leave a Comment