‘सुपर ३०’ची पहिल्या दिवशी बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई


शुक्रवारी बॉक्स ऑफिसवर आयआयटी कोचिंग संस्थेचे संस्थापक आनंद कुमार यांच्या जीवनावर आधारित ‘सुपर ३०’ हा चित्रपट रिलीज झाला. आनंद कुमार हे कोणाताही आधार नसलेली मुलंसुद्धा देशातील बुद्धिमान व्यक्तीमत्त्वांपैकी एक होऊ शकतात हे सिद्ध करण्यासाठी संघर्ष करत राहिले. ‘सुपर ३०’मधून त्याचा हाच जीवनप्रवास उलगडण्यात आला आहे. पहिल्याच दिवशी ऋतिक रोशन याची मुख्य भूमिका असलेल्या या चित्रपटाने बॉक्स ऑफिसवर सरासरी कमाई केली आहे.

ऋतिक रोशन या चित्रपटामध्ये मुख्य भूमिकेत असल्यामुळे प्रेक्षकांना या चित्रपटाबद्दल कमालीची उत्सुकता होती. त्यासोबतच या चित्रपटाच्या माध्यमातून आनंद कुमार यांचा जीवनप्रवास उलगडणार असल्यामुळे एक वेगळच कुतुहल प्रेक्षकांना होते. पण चित्रपट प्रदर्शित झाल्यानंतर प्रेक्षकांना हा चित्रपट फार काही रुचलेला दिसत नसल्यामुळे हा चित्रपट पहिल्या दिवशी साधारणपणे १२ कोटींची कमाई करु शकतो अशी शक्यता वर्तविण्यात आली आहे. विकास बहल दिग्दर्शित हा चित्रपट पहिल्या दिवशी १२ कोटींची कमाई करु शकतो. तसेच विकेंडच्या दिवशी या कमाईमध्ये वाढ होण्याची शक्यता असल्याचे वर्तविण्यात येत आहे.

Leave a Comment