संजय दत्तच्या ‘बाबा’मधील पहिले गाणे तुमच्या भेटीला


आपल्या अभिनय आणि डॅशिंग अंदाजामुळे अभिनेता संजय दत्त नेहमीच चर्चेत असतो. त्यातच आता संजयने बॉलिवूडपाठोपाठ मराठी चित्रपटसृष्टीतही एन्ट्री केली आहे. लवकरच प्रेक्षकांच्या भेटीला संजय दत्तच्या प्रोडक्शन हाऊसमध्ये बनणारा बाबा हा पहिला मराठी चित्रपट येणार आहे.

या चित्रपटाच्या निमित्ताने संजू बाबा मराठी सिनेसृष्टीत पदार्पण करणार असल्याने सुरुवातीपासूनच हा चित्रपट चर्चेत राहिला. या चित्रपटाचा ट्रेलर काही दिवसांपूर्वीच प्रेक्षकांच्या भेटीला आला होता. यानंतर चित्रपटातील अडगुल मडगुल हे गाणे आता नुकतेच रिलीज करण्यात आले आहे.

बाप लेकाच्या नात्याची खास झलक या गाण्यात पाहायला मिळत आहे. आयुष्यात येणाऱ्या प्रत्येक लहान गोष्टीचा आनंद घेत जीवन जगणारी बाप लेकाची जोडी पाहून तुमच्या चेहऱ्यावरही हसू उमटेल. रोहन प्रधानने या गाण्याला आवाज दिला आहे.

राज आर गुप्ता यांनी दरम्यान या चित्रपटाचे दिग्दर्शन केले असून चित्रपटात दिपक दोबरियाल, नंदिता पाटकर, आर्यन मेघजी, चित्ररंजन गिरी, स्पृहा जोशी आणि अभिजीत या कलाकारांच्या मुख्य भूमिका आहेत. हा चित्रपटा येत्या २ ऑगस्टला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.

Leave a Comment