पुन्हा एकदा अॅक्शन अवतार दिसणार मॅचोमॅन जॉन अब्राहम


सध्या आपल्या बाटला हाऊस चित्रपटामुळे बॉलिवूडचा मॅचोमॅन अभिनेता जॉन अब्राहम चर्चेत आहे. बाटला हाऊस येथे झालेल्या चकमकीवर आधारित चित्रपटानंतर जॉन आणखी आता एका थ्रिलर चित्रपटातून प्रेक्षकांच्या भेटीला येण्यास सज्ज झाला आहे.

याबद्दलची माहिती चित्रपट व्यापार विश्लेषकांनी ट्विट करत दिली आहे. जॉनचा या चित्रपटातही अॅक्शन अवतार प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहे. सत्य घटनेवर आधारित असणारा हा चित्रपट अॅक्शन थ्रिलर असणार आहे. या चित्रपटाचे अॅटॅक असे नाव असून लक्ष्य आर आनंद दिग्दर्शन करणार आहेत. तर याची निर्मिती धीरज वधवान, अजय कपूर आणि जॉन अब्राहम करणार आहेत.


याआधीही जॉनच्या ‘परमाणू’ आणि ‘रॉ’ चित्रपटांची निर्मिती धीरज वधवान आणि अजय कपूर यांनी केली आहे. येत्या डिसेंबरमध्ये ‘अॅटॅक’ चित्रपटाच्या चित्रीकरणाला सुरूवात होत आहे. दरम्यान चित्रपटाची कथा कोणत्या घटनेवर आधारित असणार हे अद्याप गुलदस्त्यातच असल्यामुळे या चित्रपटाबद्दलची जॉनच्या चाहत्यांची उत्कंठा शिगेला पोहोचणार आहे.

Leave a Comment