१८ हजार विद्यार्थ्यांना कॅम्पस मुलाखतीमधून नोकऱ्या देणार इन्फोसिस


बंगळुरू – नोकऱ्या देण्यासाठी देशात माहिती तंत्रज्ञान क्षेत्र हे आघाडीवरच राहिले असून पुन्हा एकदा याची प्रचिती देशातील दुसऱ्या क्रमांकाची असलेली आयटी कंपनी इन्फोसिसने दाखवून दिली आहे. १८ हजार विद्यार्थ्यांना नोकऱ्या देणार असल्याचे इन्फोसिसने जाहीर केले आहे. चालू वर्षात या सर्व नोकऱ्या दिल्या जाणार आहेत.

इन्फोसिसमध्ये सध्याच्या घडीला २.२९ लाख कर्मचारी आहेत. जरी कठीण परिस्थितीमधून कंपनी जात असली तरी ग्राहकसेवेवर कोणातही परिणाम त्याचा झाला नसल्याचे इन्फोसिसने म्हटले आहे. इन्फोसिसने चालू तिमाहीदरम्यान ८ हजार जणांना सेवेत घेतले आहे. त्यामध्ये २ हजार ५०० हे पदवी घेवून बाहेर पडलेले आहेत. आम्ही १८ हजार विद्यार्थ्यांना विद्यापीठातून चालू वर्षात घेणार असल्याचे इन्फोसिसचे चिफ ऑपरेटिंग ऑफिसर यू.बी. प्रवीण राव यांनी सांगितले. करिअरच्या संधीसह इतर अनेक उपक्रम इन्फोसिस कर्मचाऱ्यांसाठी राबवित असल्याचे त्यांनी सांगितले.

Leave a Comment