बिझनेस पार्टनर्सनी केली सेहवागच्या पत्नीची आर्थिक फसवणूक


नवी दिल्ली – आर्थिक फसवणूक झाल्याप्रकरणी टीम इंडियाचा माजी क्रिकेटपटू वीरेंद्र सेहवाग याच्या पत्नीने म्हणजेच आरती सेहवागने पोलिसात तक्रार दाखल केली आहे. माझ्या खोट्या सह्यांचा वापर करुन माझ्या व्यवसायातील भागीदारांनी साडेचार कोटींचे कर्ज घेतल्याचा आरोप करत आरती सेहवागने ही तक्रार दाखल केली आहे.

आरती सेहवागने केलेल्या आरोपानुसार तिची दिल्लीतील अशोक विहारमध्ये राहणाऱ्या रोहित कक्कडसोबत व्यावसायिक भागिदारी होती. आपल्याला विश्वासात न घेता रोहित कक्कड आणि त्याच्या काही निकटवर्तीयांनी एका बिल्डर फर्मशी संपर्क केला. त्यांनी या फर्मला सांगितले की आमच्यासोबत वीरेंद्र सेहवाग आणि आरती सेहवाग बिझनेस पार्टनर आहे.

या फर्मकडूनच रोहित कक्कड आणि त्याच्या निकटवर्तीयांनी साडेचार कोटींचे कर्ज घेतले आहे. जेव्हा रोहित आणि माझी व्यावसायिक भागिदारी झाली तेव्हा कोणत्याही गोष्टी मला कल्पना दिल्याशिवाय पुढे जाणार नाहीत हे मी स्पष्ट केले होते. पण मला या साडेचार कोटींच्या कर्जाबाबत काहीही माहित नाही. माझ्या खोट्या सह्याही यासाठी करण्यात आल्याचा आरोप आरती सेहवागने केला आहे. दिल्ली पोलिसांच्या आर्थिक गुन्हे शाखेने या प्रकरणी सगळ्या आरोपींविरोधात कलम ४२० अंतर्गत गुन्हा दाखल केला आहे.

Leave a Comment