बीएसएनएल आपल्या ग्राहकांना देत आहे कॅशबॅकसह विनामूल्य अॅमेझॉन प्राईम सदस्यता


जर आपण बीएसएनएलचा उपयोग करत असाल तर कंपनीला आपल्यासाठी खास ऑफर देत आहे. बीएसएनएल आपल्या ग्राहकांना अमेझॉन प्राईमची मोफत सदस्यता देत आहे. यापूर्वी, एअरटेलने आपल्या ग्राहकांना अॅमेझॉन प्राईमचे विनामूल्य सदस्यता दिली आहे. बीएसएनएलच्या या सब्सक्रिप्शनमध्ये प्राईम व्हिडीओसोबतच प्राईम म्युझिक देखील मोफत मिळणार आहे.

सुत्रांच्या माहितीनुसार बीएसएनएल एका वर्षासाठी ब्रॉडबँड योजनेसह अॅमेझॉन प्राईमची ऑफर देत आहे. या ऑफरचा बीएसएनएलच्या जुन्या आणि नवीन ग्राहकांना फायदा होईल. पूर्वी, अॅमेझॉनने जाहीर केले होते की केवळ भारतातील फाइबर ग्राहकांना अॅमेझॉन प्राईमची 1 वर्ष सदस्यता मिळेल, ज्याने 745 रुपये किंवा त्याहून अधिक किंमतीचा प्लान घेतला पाहिजे. तसेच, बीएसएनएल ब्रॉडबँड आणि वार्षिक लँडलाइन योजनांसाठी 12 महिन्यांसाठी 25 टक्के कॅशबॅकची ऑफर देत आहे.

अॅमेझॉन प्राईम ऑफरच्या अंतर्गत, आपण विनामूल्य प्राईम व्हिडीओ, प्राईम म्युझिकसोबतच अॅमेझॉनवरुन घेतलेल्या वस्तुंची जल्द डिलिव्हरी देखील मिळेल. सुत्रांच्या माहितीनुसार अॅमेझॉनचे प्राइम सदस्यता विनामूल्य मिळविण्यासाठी कमीतकमी 499 रुपयांचा 12 महिन्यांचा ब्रॉडबँड प्लान घेणे आवश्यक आहे.

याशिवाय, बीएसएनएल 499 रुपयांपेक्षा कमीच्या प्लानवर 15% कॅशबॅक मिळेल. 499 ते 900 रुपयांच्या प्लानवर 20% आणि 900 रुपयांवरील प्लानमध्ये 25% कॅशबॅक मिळणार आहे. तथापि, कंपनीने ही ऑफर अद्याप त्याच्या वेबसाइटवर अद्यावत केलेली नाही.

Leave a Comment