जिथे पीजी म्हणून राहत होता तोच फ्लॅट कार्तिकने एवढ्या रुपयांमध्ये केला खरेदी


अभिनेता कार्तिक आर्यन ‘प्यार का पंचनामा’, ‘सोनू के टीटू की स्वीटी’ आणि ‘लुका छुपी’ सारख्या चित्रपटांमुळे चांगलाच सिद्धीझोतात आला. नुकताच त्याने मुंबईमध्ये फ्लॅट खरेदी केला आहे. विशेष म्हणेज कार्तिकने तोच फ्लॅट खरेदी केला आहे ज्यामध्ये तो वर्षांपूर्वी पेइंग गेस्ट म्हणून रहात होता. रिपोर्ट्सनुसार, कार्तिकने यासाठी 1.60 कोटी रुपये मोजले आहेत. सोबतच 9.60 लाख रुपये स्टॅम्प ड्यूटीचे देखील दिले आहेत.

यारी रोड येथील राजकिरण को-ऑप हाउसिंग सोसाइटीमध्ये हा फ्लॅट आहे. याचा एकूण एरिया 551 चौरसफूट सांगितले जात आहे. यामधून 459 चौरसफूट कार्पेट एरिया आहे. बिल्डिंगच्या पाचव्या फ्लोअरवर फ्लॅट आहे. रिपोर्ट्समध्ये सांगितले जात आहे की, ही प्रॉपर्टी कार्तिकने याचवर्षी मेमध्ये खरेदी केली आहे. त्याची आई माला तिवारीचे नावदेखील पेपर्समध्ये सामील झाले आहे. यासोबतच त्याचा स्थायिक पत्ता ग्वालियर दाखवला गेला आहे.

Leave a Comment