मुंबई पोलिसांनी बंद केली पायल रोहतगीची टिवटिवाट


आपल्या ट्विट आणि वक्तव्यामुळे बिग बॉसची स्पर्धक आणि अभिनेत्री पायल रोहतगी नेहमी चर्चेत असते. ती आता मुंबई पोलिसांनी ट्विटरवर ब्लॉक केल्यामुळे चर्चेत आहे. तिने यावेळी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, मुख्यमंत्र्यांची पत्नी अमृता फडणवीस आणि केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांना पत्र पाठविले असून आपण मुंबई पोलिसांनी ब्लॉक केल्यामुळे असुरक्षित असल्याचे रोहतगीने म्हटले आहे.


तसेच हिंदू म्हणून हिंदुस्तानात राहायची भीती मुंबई पोलिसांच्या अशाप्रकारच्या वागणुकीमुळे वाटत असल्याचे रोहतगीने म्हटले आहे. सध्या सोशल मीडियावर या वादग्रस्त वक्तव्यांमुळे अभिनेत्री पायल रोहतगी चांगलीच चर्चेत आली आहे. तिने काही दिवसांपूर्वी राजाराम मोहन रॉय यांच्याबाबत वादग्रस्त ट्विट केले होते. तिने आताही तसेच वादग्रस्त वक्तव्य केले आहे. मुंबई पोलिसांनी तिला ट्विटरवर ब्लॉक केले आहे.