जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांच्या यादीत एकमेव भारतीय कलाकार


अभिनेता अक्षय कुमारने बॉलिवूडमध्ये एक नवा विक्रम आपल्या नावावर नोंदवला आहे. अक्षयने बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणाऱ्या यादीत पहिले स्थान मिळवले आहे. जगातील सर्वाधिक कमाई करणाऱ्या कलाकारांची यादी फोर्ब्सने जाहीर केली. एकमेव भारतीय अभिनेता अक्षय कुमारच्या नावाचा या यादीत सामावेश आहे. फोर्ब्सच्या यादीत 35 व्या क्रमांकावर अक्षय कुमार आहे. तर गायक टेलर स्विफ्ट पहिल्या स्थानावर आहे.

अभिनेता अक्षय कुमारला बॉलिवूडमध्ये सर्वाधिक कमाई करणारा अभिनेता असल्याचे फोर्ब्सने सांगितले. अक्षय कुमारने 2018 जून ते 2019 या एक वर्षात 444 कोटी रुपयांची कमाई केली. अक्षयने या शानदार कमाईसोबत आंतरराष्ट्रीय स्टार रिहाना, जॅकी चेन, स्कारलेट जोहनसन आणि ब्रँडली कपूरलाही मागे टाकले आहे.

सध्या आपल्या नवीन चित्रपटाच्या कामात अक्षय व्यस्त आहे. यामध्ये मिशन मंगल, हाऊसफुल्ल 4, गुड न्युज, लक्ष्मी बॉम्ब आणि सूर्यवंशी या चित्रपटांचा समावेश आहे. 15 ऑगस्ट रोजी मिशन मंगल प्रदर्शित होणार आहे. 2019 मध्ये अक्षय कुमारचा केसरी चित्रपट प्रदर्शित झाला. केसरीने बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती. गेल्यावर्षी अक्षयने 2.0, पॅडमॅन, गोल्ड हे चित्रपट प्रदर्शित झाले होते. सर्व चित्रपटांनी बॉक्स ऑफिसवर मोठी कमाई केली होती.

Leave a Comment