जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षकानेही मानले धोनीचे आभार


मुंबई : भारत विरुद्ध न्युझीलंड विश्वचषकातील सेमीफायनलमध्ये भारताला पराभव पत्कारावा लागला. पण महेंद्र सिंह धोनीचे पराभवानंतरही सर्वत्र कौतुक होत आहे. रोहित शर्मा, विराट कोहलीसारखे फंलदाज या सामन्यात एक धावा करत बाद झाले. पण धोनीने मात्र अर्धशतक पूर्ण केले. धोनीचे त्याच्या चाहत्यांशिवायही अनेक दिग्गजांनी कौतुक केले. यामध्येच जगातील सर्वोत्कृष्ट यष्टीरक्षक एडम गिलक्रिस्टचाही समावेश आहे. ट्विट करत धोनीचे गिलक्रिस्टनेही कौतुक केले आहे.


ट्विट करत, पुढे जाऊन तुम्ही खेळणार की नाही माहित नाही. पण क्रिकेटला तुम्ही खूप काही दिले. तुमचा शांत स्वभाव आणि आत्मविश्वास खूप कौतुकास्पद असल्याचे एडम गिलक्रिस्टने म्हटले आहे. न्युझीलंड विरुद्ध 350 व्या सामन्यात धोनीने 50 धावांची शानदार खेळी केली. पण संघाला विजयी करण्यात अपयश आले. विश्वचषक सामन्यात धोनीने रवींद्र जडेजासोबत मिळून सातव्या विकेटसाठी सर्वात मोठी भागीदारी करत रेकॉर्ड केला. पण ही भागीदारी भारताला विजयी करु शकली नाही.

आपले सहा विकेट भारताने 92 धावांवर गमावले होते आणि पराभवाच्या दिशेने भारताची वाटचाल सुरु झाली होती. पण जडेजा आणि धोनीने सातव्या विकेटसाठी 116 धावा जोडत संघाला सामन्यात वाचवून ठेवले. दरम्यान, शेवटच्या षटकात दोन्ही खेळाडू पॅव्हेलियनमध्ये परतले.

सातव्या विकेटसाठी विश्वचषकातील ही सर्वात मोठी आणि पहिली शतकीय भागीदारी आहे. यापूर्वी वेस्टइंडीजच्या रेडली जॅकब्स आणि रामनरेश सरवनने 13 फेब्रुवारी 2003 रोजी न्युझीलंड विरुद्ध 98 धावांची भागीदारी केली होती. जडेजा आणि धोनीने न्युझीलंड विरुद्ध सामन्यात जॅकब्स आणि सरवनचा विक्रम मोडला. जडेजाने 59 चेंडूत 4 चौकार आणि 77 धावा केल्या. धोनीने 72 चेंडूत चार चौकार आणि एक षटकार करत 50 धावा केल्या.

Leave a Comment