फ्लिपकार्ट लाँच करणार आपले स्वतःचे क्रेडिट कार्ड


मुंबई : अ‍ॅक्सिस बँक आणि मास्टरकार्ड यांच्यासोबत हातमिळवणी करत देशातील सर्वात मोठी ई कॉमर्स कंपनी फ्लिपकार्ट क्रेडिट कार्ड लाँच करणार आहे. फ्लिपकार्टच्या नव्या क्रेडिट कार्डमध्ये ऑनलाइन आणि ऑफलाइन शॉपिंगवर 5 टक्के कॅशबॅकबरोबर अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल. याशिवाय ग्राहकांना अनेक सुविधा मिळतील.

फ्लिपकार्टच्या म्हणण्याप्रमाणे, ग्राहकांना नव्या कार्डासाठी रजिस्ट्रेशन दर म्हणून 500 रुपये द्यावे लागतील. 2 लाख रुपयाच्या खरेदीवर वर्षाचा चार्ज माफ केला जाईल. ग्राहकांच्या स्टेटमेंटमध्ये दर महिन्याला कॅशबॅक ऑटो क्रेडिट होईल.

फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँक क्रेडिट कार्डद्वारे कंपनीचे को-ब्रँड मर्चंट फ्लिपकार्ट, Myntra आणि 2GUD इथून सामान खरेदी केले तर ग्राहकांना 5 टक्के कॅशबॅक मिळेल. फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँक यांनी थर्ड पार्टी मर्चंटसोबत भागीदारी केली आहे. Make My Trip, Uber, PVR, Urban Clap, Curefit येथून तुम्ही काही खरेदी केली तर 4 टक्के कॅशबॅक मिळेल. इतर सर्व मर्चंटच्या खरेदीवर कार्डहोल्डरला 1.5 टक्के अनलिमिटेड कॅशबॅक मिळेल.

ग्राहकांना फ्लिपकार्ट-अ‍ॅक्सिस बँकच्या क्रेडिट कार्डावर वेल्कम बेनिफिट म्हणून को ब्रँडेड मर्चंट्स आणि थर्ड पार्टी प्लॅटफाॅर्ममधून खरेदी केली तर 3 हजार रुपये मिळतील. याशिवाय ग्राहकांना देशभरातील रेस्टाॅरंटमध्ये 20 टक्क्यांपर्यंत सवलत मिळेल आणि 1.5 टक्के कॅशबॅक मिळेल. त्याचबरोबर ग्राहकांना दर महिन्याला इंधनाच्या सरचार्जवर 1 टक्का म्हणजे 500 रुपये सूट मिळेल.

Leave a Comment