मुंबई – टीम इंडियाचे चाहते विश्वचषक स्पर्धेमध्ये न्यूझीलंडविरोधात पराभव झाल्यानंतर दुःखात बुडाले. सोशल मीडियावर या पराभवानंतर मीम्सचा तर पूरचा आला. पुन्हा एकदा अनुष्का शर्मावरून मीम व्हायरल होत आहेत. अनुष्का शर्मा आणि वरुण धवन यांच्या सुई धागा चित्रपटातील एक सीन व्हायरल होणाऱ्या मीम्समध्ये वापरण्यात आला आहे. त्याचबरोबर त्यात विराट कोहलीही भरडला गेला आहे.
अनुष्काच्या मागे हात धूवुन लागले नेटकरी
" Babe, get me some Sui Dhaaga. We can't let my lips tell the world all the swear words I know " @cricketworldcup@imVkohli @AnushkaSharma #indiavsNewzealand #indiacricket pic.twitter.com/LXVbxfdi7j
— Preeti Dhakappa (@DhakappaPreeti) July 11, 2019
अनुष्काने सुई धागा चित्रपटात मेकअप केला नव्हता. ती ग्लॅमरस अवतारापेक्षा फार वेगळी दिसत होती. ती चित्रपटातील एका सीनमध्ये खाली बसून रडताना दिसते. नेमका हाच फोटो व्हायरल होत आहे. अनुष्का शर्मावर मीम्स बनण्याची ही काही पहिलीच वेळ नाही. याआधीही तिच्यावर अनेक मीम्स तयार करण्यात आले आणि विशेष म्हणजे प्रत्येकवेळी भारतीय क्रिकेट संघाचा कर्णधार आणि तिचा नवरा विराट कोहली यात भरडला जातो.