पुन्हा एका फोटोमुळे चर्चेत आली राखी सावंत


बॉलीवूडची ड्रामा क्वीन अर्थात राखी सावंत आपल्या काही ना काही अतरंगी गोष्टींमुळे, वक्तव्यामुळे नेहमीच चर्चेत असते. तिच्या चाहत्यांना तिचा बिनधास्तपणा, हटके अदाच खूप आवडतात. अशी ही बिनधास्त, बेधडक राखी सावंत सोशल मिडियावर देखील तितकीच सक्रिय असते. ती आपल्या चाहत्यांसोबत संपर्कात राहण्यासाठी नेहमी सोशल अकाउंटवर काही ना काही शेअर करत असते. सोशल मिडियावर तिने नुकताच आपला एक फोटो शेअर केला आहे. तिच्या चाहत्यांनी हा फोटो पाहून तिची स्तुती देखील केली आहे तर काहींनी तिची खिल्ली उडवली आहे.

View this post on Instagram

Good night 💤 💤

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on

View this post on Instagram

Fainaly good night sweet dreams

A post shared by Rakhi Sawant (@rakhisawant2511) on


ती या फोटोत खूपच भयानक दिसत असून काहींना तो फोटो पाहिला तर भीती देखील वाटेल. पण असे असताना तिने चक्क ह्या फोटो खाली ‘गुड नाईट, स्वीट ड्रीम्स’ असे लिहिले आहे. आपल्या बिनधास्त अदा आणि बोलण्यामुळे राखी नेहमी चर्चेत असते. ‘परदेसियां’ या गाण्यामुळे राखी सावंत खरी ओळख मिळाली. तिचे अख्खे आयुष्यच या गाण्यामुळे बदलून गेले. मग बिग बॉस, राखी का स्वयंवर यांसारख्या अनेक रिअॅलिटी शो मधून ती झळकली.

Leave a Comment