कोणत्याही क्षणी होऊ शकते हनी सिंहला अटक


मोहालीच्या माटौर पोलीस ठाण्यात प्रसिध्द रॅप गायक यो यो हनी सिंह याच्या विरोधात तक्रार दाखल करण्यात आली असून ‘मखना’ या नव्या गाण्यात महिलांबद्दल अपशब्द वापरल्याचा आरोप त्याच्यावर आहे. त्याच्यासोबत ‘मखना म्यूझिक अल्बम’चे निर्माते भूषण कुमार यांच्या विरोधातही तक्रार दाखल झाली आहे. पंजाब महिला आयोगाने ही कारवाई केली आहे.

बऱ्याच काळापासून संगीतक्षेत्रापासून हनी सिंह दूर होता. त्याने या क्षेत्रात ‘मखना’ या अल्बच्या माध्यमातून पुनरागमन केले. पण आक्षेपार्ह शब्द महिलांबद्दल गाण्यात वापरल्यामुळे त्याला झटका बसला आहे. गायिका नेहा कक्कडदेखील या गाण्यात आहे. अद्याप तिचे नाव तक्रारीत नसले तरी तीदेखील अडचणीत येऊ शकते. नेहाचेही नाव महिला आयोगाने केलेल्या तक्रारीत आहे.

माटौर पोलीस ठाण्यात हनी सिंहच्या विरोधात तक्रार दाखल झाली. २९४ आणि ५०६ या कलमांच्या अंतर्गत त्याच्या विरोधात मामला दाखल करण्यात आला आहे. त्याला पोलीस कधी अटक करतात याकडे सर्वांचे लक्ष लागले आहे. पंजाब महिला आयोगाच्या अध्यक्षा मनीषा गुलाटी यांनी पंजाबचे डीजीपी दिनकर गुप्ता यांना पत्र लिहून हनी सिंह व इतरांच्या विरोधात तक्रार दाखल करण्याची विनंती केली होती. यानुसार ही कारवाई झाली आहे.

Leave a Comment