जॉन सीना शिल्पा शेट्टीच्या मुलगा विआनवर फिदा


सोशल मीडियावर अभिनेत्री शिल्पा शेट्टी-कुंद्राने एक व्हिडिओ शेअर केला आहे. तिचा ७ वर्षाचा मुलगा यात डब्लूडब्लूईबद्दलचे आपले प्रेम व्यक्त करताना दिसत आहे. विशेष म्हणजे या खेळाविषयी त्याने दाखवलेली आपली हुशारी आणि जॉन सीनावरचे प्रेम यामुळे या खतरनाक खेळाचा हा चिमुकला किती मोठा फॅन आहे हे लक्षात येते.

हा व्हिडिओ शिल्पाने शेअर केल्यानंतर तिचा मुलगा विआन प्रकाश झोतात आला आहे. सर्वत्र त्याच्या हुशारीचे कौतुक होत आहे. व्हिडिओ शेअर करीत शिल्पाने लिहिले होते, ”OMG ! पहिल्याच सोलो मुलाखतीत माझा मुलगा विआन याने डब्लूडब्लूई आणि जॉन सीनाबद्दलचे प्रेम व्यक्त केले. एवढे काही त्याला माहिती आहे याची कल्पना मला नव्हती. डब्लूडब्लूई इंडियाचे त्याचे स्वप्न पूर्ण केल्याबद्दल खूप आभार.


जॉन सीनाने या व्हिडिओच्या अखेरीस विआनला व्हिडिओ मेसेज दिला आहे. छोटा विआन त्याचा मेसेज पाहून आनंदाने उड्या मारताना दिसत आहे. जॉन सीना व्हिडिओमध्ये म्हणतो, विआन, मी तुझा जॉन सीना बोलत आहे. तुझा व्हिडिओ आणि तुझे मसल मी पाहिले. परत जीममध्ये मला जावे लागेल आणि व्यायाम पुन्हा सुरू करावा लागेल. तू एकदम भारी आहेस. मला तुला माय टाईम इज अप, युवर टाईम इज नाऊ हे गाणे गाताना मला पाहायचे आहे. विआन मुला, आता तू चमकत आहेस.

Loading RSS Feed

Leave a Comment