युवराजचे भन्नाट चॅलेंज गब्बरने स्वीकारले


सध्या ‘बॉटल कॅप चॅलेंज’ सोशल मीडियावर चांगलेच व्हायरल होत आहे. सेलिब्रिटींनाही या चॅलेंजची भूरळ पडली आहे. हे चॅलेंज अक्षय कुमारसह अनेक बॉलिवूडमधील दिग्गजांनी पूर्ण केले आहे. आता युवराजची देखील यामध्ये भर पडली आहे. ‘बॉटल कॅप चॅलेंज’ युवराजने पूर्ण केले असून त्याने सचिन तेंडूलकर, शिखर धवन, ख्रिस गेल आणि ब्रायन लारा यांनाही ते चॅलेंज पूर्ण करण्याचे आवाहन केले आहे.


इन्स्टाग्रामवर एक व्हिडीओ युवराजने पोस्ट केला आहे. बॅटने चेंडू मारून बॉटलचे टोपन यामध्ये त्याने उडवले आहे. युवराजने क्रिकेटमधील दिग्गजांना हे अनोखे चॅलेंज केले आहे. त्यातच आता टीम इंडिया गब्बर अर्थात शिखर धवन याने युवराज सिंगचे हे अनोख चॅलेंज स्वीकारले आहे. ट्विट करत चॅलेंज स्वीकारल्याचे युवराजला शिखर धवनने सांगितले आहे.


हरभजन सिंगने युवराजच्या या चॅलेंजला रिप्लाय देत मजेशीर उत्तर दिले आहे. हरभजन म्हणतो, पाजी, एवढे मोठे चॅलेंज नकोस देऊ, कोणाला जमणार नाही. तर मुनाफ पटेलनेही युवराजच्या या चॅलेंजवर आपली प्रतिक्रिया दिली आहे. चॅलेंज चांगले असल्याचे मुनाफने म्हटले आहे.

Leave a Comment