अमेय वाघ आणि सई ताम्हणकर यांची गोड केमिस्ट्री दाखविणाऱ्या गर्लफ्रेंड या चित्रपटाचा ट्रेलर नुकताच रिलीज करण्यात आला आहे. जन्मापासून सिंगल असणाऱ्या मुलाला जेव्हा अचानक गर्लफ्रेंड पटते, तेव्हा घडणारी इंटरेस्टिंग गोष्ट या चित्रपटाच्या ट्रेलरमध्ये दाखविण्यात आली आहे. या चित्रपटात अमेय आणि सईने नचिकेत आणि अलिशा यांची भूमिका साकारली आहे. उपेंद्र सिधये यांनी या चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे. तर रणजित गुगळे आणि अनिश जोग यांची निर्मिती आहे.
सई आणि अमेयच्या ‘गर्लफ्रेंड’ चा ट्रेलर रिलीज
सईचा या ट्रेलरमधील लूक हा वाखाणण्याजोगा आहे. तर अमेय ही थोडा जाड दिसत असून त्याची भूमिकाही हटके असेल असे एकूणच या ट्रेलरवरुन दिसत आहे.
या चित्रपटाचे पोस्टर जेव्हा रिलीज झाले होते, तेव्हा अमेयची गर्लफ्रेंड कोण असेल याबाबत सर्वांना उत्सुकता लागली होती. त्यानंतर या चित्रपटाचा अलीकडेच टीजर रिलीज झाला. सई ताम्हणकरला त्यात पाहून प्रेक्षकांची या चित्रपटाबाबतची उत्सुकता आणखीनच वाढली. ज्या मुलाच्या आयुष्यात कधीच कोणी गर्लफ्रेंड बनू शकली नाही, त्याच्या आयुष्यात जेव्हा एक सुंदर मुलगी येते तेव्हा त्याचे आयुष्य कसे बदलते त्याचा सुंदर प्रवास यात मांडण्यात आला आहे. येत्या 26 जुलैला ‘गर्लफ्रेंड’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. अमेय आणि सई व्यतिरिक्त या चित्रपटात रसिका सुनील, ईशा केसकर, सुयोग गो-हे, कविता लाड, सागर देशमुख प्रमुख भूमिकेत दिसतील.