अक्षय कुमारच्या ‘मिशन मंगल’चा टीझर रिलीज


अभिनेता अक्षय कुमार शिवाय अभिनेत्री विद्या बालन, तापसी पन्नू, सोनाक्षी सिन्हा, नित्या मेनन, किर्ती कुलहारी आणि शर्मन जोशी अशा एकापेक्षा एक कलाकारांची फौज सर्व भारतीयांची मान गर्वाने उंच करणाऱ्या ‘मिशन मंगल’ चित्रपटात पाहायला मिळणार आहे. नुकताच या चित्रपटाचा टीझर रिलीज करण्यात आला आहे. मंगळ ग्रहापर्यंत पोहोचण्याची तयारी आणि त्यामागील खरी गोष्ट चित्रपटाच्या माध्यमातून रेखाटण्याचा प्रयत्न चित्रपटाच्या टीझरमध्ये करण्यात आला आहे.

अक्षय कुमारला भारतीय वैज्ञानिक राकेश धवन यांचे व्यक्तीमत्व साकारण्याची जबाबदारी देण्यात आली आहे. टीझरच्या माध्यमातून चित्रपटातील प्रत्येक कलाकाराची एक झलक चाहत्यांना अनुभवता येत आहे. हा चित्रपट येत्या स्वातंत्र्यदिनी म्हणजेच १५ ऑगस्ट रोजी चित्रपट रिलीज होणार आहे. जगन शक्ती यांनी चित्रपटाचे दिग्दर्शन केले आहे.

चित्रपटाचा टीझर खुद्द अक्षय कुमारने स्वत:च्या इन्स्टाग्राम अकाउंटवरून रिलीज केला आहे. ‘मिशन मंगल’ चित्रपटाचा टीझर प्रदर्शित करत कॅप्शनमध्ये, हा चित्रपट माझ्या मुलीसाठी आणि तिच्या वयातील प्रत्येक मुलांसाठी मी साकारला आहे. मला आशा आहे की ‘मिशन मंगल’ चित्रपट जेवढा प्रेक्षकांचे मनोरंजन करेल, तेवढाच त्यांना प्रेरित सुद्धा करेल, असे त्याने म्हटले आहे.

Leave a Comment