
लंडन – २०१९ च्या विम्बल्डन स्पर्धेत मोठ्या विक्रमाची नोंद स्वित्झर्लंडचा टेनिसस्टार आणि आठ वेळा विम्बल्डन विजेता रॉजर फेडररने केली. या स्पर्धेच्या अंतिम १६ मध्ये स्थान पटकावत फेडररने आपल्या ३५० व्या विजयाला गवसणी घातली.
विम्बल्डन स्पर्धेत रॉजर फेडररचा भीमपराक्रम
फ्रान्सच्या लुकास पाउली याचा फेडररने ७-५, ६-२, ७-६ असा पराभव करत ग्रँडस्लॅममधील आपल्या 350 व्या विजयची नोंद केली आहे. या विजयासह त्याने १७ वेळा विम्बल्डनच्या चौथ्या फेरीत आपले स्थान पक्के केले आहे. फेडरर हा भीमपराक्रम करणारा पहिलाच खेळाडू ठरला आहे. अमेरिकेच्या जिमी कॉनर्सचा विक्रम फेडररने मोडीत काढला आहे.
फेडरर या विजयानंतर म्हणाला, आज मी खूप खूष आहे. लुकासबरोबर छान सामना झाला. नक्कीच, मला आशा आहे की, मला थांबविण्यासाठी एखाद्याने विशेष प्रदर्शन करावे. या स्पर्धेत भारताच्या मिश्र दुहेरीचे आव्हान संपुष्टात आले आहे. बोपन्ना-सबालेंका या जोडीला सिटाक – सिगेमंड या जोडीकडून पराभवाचा सामना करावा लागला. तर, शरण आणि यिंगयिंग दुआन यांना एडेन सिल्वा व इवान होयत या जोडीकडून पराभूत व्हावे लागले.
