लग्नाच्या वाढदिवसानिमित्त शाहिदची रोमँटिक पोस्ट


शाहिद कपूर आणि मीरा राजपूतच्या जोडीकडे बॉलिवूडमधील मोस्ट लव्हेबल कपल म्हणून पाहिले जाते. आपल्या रोमँटिक फोटोजमुळे ही जोडी नेहमीच चर्चेत असते. शाहिद आणि मीराच्या लग्नाचा आज चौथा वाढदिवस आहे. दोघांनीही यानिमित्ताने एकमेकांचे फोटो शेअर करत खास पोस्टही लिहिल्या आहेत.


लग्नातील एक फोटो शेअर करत मीराने शाहिद आपले जग असल्याचे म्हटल्यानंतर आता आपल्या इन्स्टाग्रामवरून शाहिदने मीरा राजपूतचा एक फोटो शेअर केला आहे. त्याने या फोटोला कॅप्शनही दिले आहे. दोघांच्या नात्यातील गोडवा या खास कॅप्शनमधून स्पष्टपणे जाणवतो.

माझ्या फोनमधील तिचा पहिला फोटो आणि आता जवजवळ प्रत्येक एका फोटोनंतर तिचाच फोटो माझ्या फोनमध्ये दिसतो. ती माझे आयुष्य आहे. माझ्यासोबत असेच बनून राहण्यासाठी धन्यवाद, असे म्हणत शाहिदने मीराला लग्नाच्या वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या आहेत.

Leave a Comment