स्विमिंग पूलमधील हॉट फोटोमुळे पुन्हा चर्चेत आली प्रियंका चोप्रा


बॉलीवूड तसेच हॉलीवूडमध्ये आपल्या अभियानाची छाप पाडणारी देसी गर्ल अर्थात प्रियंका चोप्रा नेहमीच आपल्या फॅशन सेन्स आणि मादक अदांमुळे चर्चेत असते. प्रियंका चोप्रा सध्या आपल्या पती निक जोनाससोबत इटलीमध्ये सुट्टया एन्जॉय करत आहे. ती आपल्या सोशल अकाउंटवर या सुट्ट्यांचे फोटोज शेअर करत आहे. प्रियंका चोप्रा आणि निक जोनासचा एक व्हिडिओ काही दिवसांपूर्वी समोर आला होता. ते दोघे ज्यात एका सुंदर संध्याकाळी एक सुंदर असा रोमँटिक डान्स करत होते. तिचे चाहते हा डान्स पाहून तिच्यावर कौतुकाचा वर्षावच करत होते. त्यातच प्रियंकाने आता या सुट्ट्यांमधील आपले हॉट फोटो शेअर केले आहेत.


प्रियंका या फोटोंमध्ये स्विमिंग पूलमध्ये मनसोक्त भिजताना दिसत आहे. त्यात पांढ-या रंगाचा स्विम सूट तिने परिधान केला आहे. ती ज्यात खूपच हॉट आणि सेक्सी दिसत आहे. खुद्द निकने हे फोटो क्लिक केल्यामुळे हे फोटो तिने सोशल मिडियावर शेअर केले आहेत. लग्नानंतर आपले फोटो प्रियंका चोप्रा आणि निक जोनास शेअर करतच असतात. ज्यात या दोघांमध्ये भन्नाट केमिस्ट्री आपल्याला पाहायला मिळते.

View this post on Instagram

It’s in the air.. ❤️

A post shared by Priyanka Chopra Jonas (@priyankachopra) on


प्रियंका ब-याच काळानंतर ‘द स्काय इज पिंक’ या हिंदी चित्रपटातून बॉलिवूडमध्ये कमबॅक करणार आहे. तिच्यासोबत या चित्रपटात फरहान अख्तर आणि जायरा वसीम मुख्य भूमिकेत दिसतील. 11 ऑक्टोबरला हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.

Leave a Comment