अ‍ॅपल कंपनीला ‘सफरचंद’ समजणारी पाकिस्तानी अँकर झाली ट्रोल


सोशल मीडियावर एक व्हिडीओ सध्या चांगलाच व्हायरल होत आहे. या व्हिडीओमध्ये एक पाकिस्तानी अँकरने टिव्हीवर चर्चा करत असताना, गोंधळून जाऊन अ‍ॅपल कंपनीला चक्क सफरचंदच समजले आहे. कार्यक्रमामध्ये उपस्थिती असलेले पॅनलिस्ट अ‍ॅपल कंपनीबद्दल सांगत असताना, अँकरने त्याला फळच समजले आहे.


सोशल मीडियावर क्रार्यक्रमाचा हा व्हिडीओ चांगलाच व्हायरल होत आहे. त्यावरून पाकिस्तनी अँकरची जोरदार खिल्ली उडवली जात आहे. या व्हिडीओला पत्रकार नायला इनायतने ट्विटरव शेअर केले आहे.


व्हिडीओ क्लिपमध्ये दिसून येते की, न्यूज अँकर आणि एक पॅनलिस्ट स्टुडिओमध्ये बोलत आहेत. यावेळी बोलताना पॅनलिस्ट पाकिस्तानच्या आर्थिक स्थितीबद्दल बोलत आहेत. यावेळी बोलताना पॅनलिस्ट म्हणत आहे की, पुर्ण पाकिस्तनाच्या वार्षिक बजेटच्या तुलनेत एकट्या अ‍ॅपलचा व्यवसाय अधिक आहे. यावर अँकरला अ‍ॅपल म्हणजे आयफोन न वाटता फळ वाटले. यावर बोलताना टीव्ही अँकर म्हणाली की, हा, मी ऐकले आहे की, सफरचंद देखील खुप महाग आहे.


यावर पॅनलिस्टने लगेचच आपण टेक्नोलॉजी कंपनी अ‍ॅपलविषयी बोलत असल्याचे सांगत, अँकरची चुक सुधारली. यावर अँकरने देखल हसत हसत आपली चुकी मान्य करत कार्यक्रम पुढे सुरू ठेवला. मात्र या कार्यक्रमाचा हा व्हिडीओ सोशल मीडियावर शेअर होत असून, अँकरची खिल्ली उडवण्यात येत आहे.

Leave a Comment