भाजपचे सदस्यत्व घेतल्यामुळे मुस्लीम महिलेची घरातून हकालपट्टी


लखनऊ : एका मुस्लिम महिलेला भाजपचे सदस्यत्व घेतल्यामुळे आपले घर खाली करावे लागले आहे. उत्तर प्रदेशमध्ये सुरु असलेल्या भाजपच्या सदस्य नोंदणी कार्यक्रमात जाऊन महिलेने सदस्यत्व घेतल्यामुळे मला घर मालकाने घर खाली करायला सांगितले, असा आरोप घर मालकावर या महिलेने केला आहे. या महिलेचे नाव गुलिस्ताना असे आहे.

देहलीगेट पोलीस ठाण्यात तक्रारदार महिलेने या घटनेची तक्रार केली आहे. पोलिसांनी तक्रार केल्यानंतर आता कारवाई करण्यास सुरुवात केली आहे. अलीगड येथील शाहजमाल एडीए कॉलनीतील ही घटना आहे. भाजपच्या सदस्य नोंदणी अभियानातून येथे राहणाऱ्या गुलिस्तानाने पक्षाचे सदस्यत्व स्विकारले.

रघुनाथ पॅलेसमध्ये भाजपच्या कार्यक्रमात भाजप महिला मोर्चा मंत्री रुबी आसिफ खानसोबत तक्रारदार गुलिस्ताना गेल्या होत्या. त्यांनी तिथे मिस कॉलच्या माध्यमातून भाजपचे सदस्यत्व स्विकारले. रविवारी वृत्तपत्रात कार्यक्रमातील फोटो प्रकाशित झाला. फोटोमध्ये गुलिस्तानला पाहून घरमालक वैतागला आणि तिला घर खाली करण्यास त्याने सांगितले.

लवकरात लवकर घर खाली करण्यास घर मालकाने अपशब्द वापरत महिलेला सांगितले. घर मालक सुल्तान आणि त्याची पत्नी मदीना भाजपचे सदस्यत्व घेतल्यामुळे दोघांनीही तिला घरातून बाहेर काढण्याची धमकी दिली. तक्रार केल्यानंतर पोलिसांनी कारवाई करण्यास सुरुवात केली.

Leave a Comment