तापसीने शेअर केले ‘सांड की आँख’च्या सेटवरचे फोटो


‘सांड की आँख’ या चित्रपटात अभिनेत्री तापसी पन्नु आणि भूमी पेडणेकर या दोघीही झळकणार आहेत. शार्प शुटर दादी चंद्रो आणि प्रकाशी तोमर यांच्या जीवनावर आधारित हा चित्रपट आहे. या चित्रपटातून उतारवयात शार्पशुटिंगचे प्रशिक्षण घेऊन आतंरराष्ट्रीय स्तरावर नाव कोरलेल्या या दादींवर प्रकाश टाकण्यात येणार आहे. या चित्रपटाचे शूटिंग काही दिवसांपूर्वीच पूर्ण झाले. तापसीने सोशल मीडियावर चित्रपटाच्या सेटवरचे काही खास फोटो शेअर केले आहेत.


भूमी आणि तापसी या चित्रपटात पुर्णत: वेगळ्या रुपात प्रेक्षकांना पाहायला मिळणार आहेत. तापसीने शेअर केलेल्या फोटोत देखील भूमी आणि तापसीचा वेगळा लूक पाहायला मिळतो. या चित्रपटाला सुरुवातीला ‘वो वुमनिया’ असे नाव देण्यात आले होते. त्यानंतर हे नाव बदलून ‘सांड की आँख’ असे ठेवण्यात आले. यामध्ये तापसी आणि भूमी व्यतिरिक्त प्रकाश झा आणि विनीत कुमार हे देखील झळकणार आहेत. या चित्रपटाची निर्मिती अनुराग कश्यप आणि तुषार हिरानंदानी हे करत असून दिवाळीच्या मुहूर्तावर हा चित्रपट प्रदर्शित होईल.

Leave a Comment