आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून शोएब मलिकची निवृत्ती


लंडन – काल आयसीसी विश्वकप स्पर्धेत बांगलादेश विरुद्ध पाकिस्तान सामना खेळला गेला. पाकिस्तानने या सामन्यात बांग्लादेशावर 94 धावांनी विजय मिळविला. पाकिस्तान संघाचा अनुभवी खेळाडू शोएब मलिकने या विजयानंतर आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा केली आहे.

शोएब मलिकला यंदाच्या विश्वचषक स्पर्धेमध्ये विशेष कामगिरी करता आली नाही. त्याने या विश्वचषक स्पर्धेत 3 सामने खेळले आणि केवळ 8 धावा केल्या. भारताविरूद्ध मलिकने शेवटचा सामना खेळला, तो ज्यामध्ये शून्यवर बाद झाला. त्यामुळे चाहते त्यावर नाराज होते. यानंतर त्याच्या जागी हरिस सोहेलला संघात स्थान देण्यात आले. सोहेलने चांगले प्रदर्शन केले आणि त्यानंतर मलिकला एकही सामना खेळण्याची संधी मिळाली नाही.

आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटच्या कारकिर्दीत शोएब मलिकने 9 शतक आणि 44 अर्ध शतके ठोकली आहेत. त्याने आंतरराष्ट्रीय एकदिवसीय क्रिकेटमध्ये 158 बळी घेतले आहेत. तर 7534 धावा केल्या आहेत. त्याने आंतरराष्टीय एकदिवसीय क्रिकेटमधून निवृत्तीची घोषणा ही आपल्या टिव्टर अकाऊंटद्वारे दिली. यात शोएबने आपल्या सहकाऱ्यांचे आणि चाहत्यांचे आभार मानले आहेत.

Leave a Comment