कंगनाचे धाकड पोस्टर रिलीज


आपल्या आगामी ‘जजमेंटल है क्या’ या चित्रपटामुळे बॉलिवूडची ‘क्विन’ अशी ओळख असणारी कंगना राणावत सध्या चर्चेत आहे. हा चित्रपट प्रकाश कोवेमालुदी यांच्या दिग्दर्शनाखाली तयार होत आहे. तिच्यासोबत या चित्रपटात राजकुमार राव हा देखील मुख्य भूमिकेत झळकणार आहे. त्याचबरोबर आणखी एका चित्रपटातून कंगना प्रेक्षकांच्या भेटीला येणार असल्याची माहिती आहे. तिच्या आगामी चित्रपटाचे नाव ‘धाकड’ असे असणार आहे. नुकतेच या चित्रपटाचे फर्स्ट पोस्टर रिलीज करण्यात आले आहे. यावर्षी कंगनाचा ‘मणिकर्णिका’ चित्रपट बॉक्स ऑफिसवर हिट ठरला. तिचा ‘जजमेंटल है क्या’ हा चित्रपटदेखील आता प्रदर्शनाच्या वाटेवर आहे. ती या चित्रपटानंतर ‘धाकड’ चित्रपटात मुख्य भूमिकेत दिसेल.


याबाबत एका माध्यमाने दिलेल्या वृत्तानुसार, ‘धाकड’ हा एक अॅक्शन चित्रपट असणार आहे. हा चित्रपट अनेक विदेशी लोकेशन्सवर शूट करण्यात येणार आहे. या चित्रपटाचे पहिले पोस्टर सोशल मीडियावर चित्रपट समीक्षक तरण आदर्श यांनी शेअर केले आहे. कंगनाचा पाठमोरा लूक या पोस्टरमध्ये पाहायला मिळत आहे. या चित्रपटाचे दिग्दर्शन रजनीश घई हे करणार आहेत. तर, निर्मिती सोहेल माकलाई हे करत आहेत. हा चित्रपट पुढच्या वर्षी रिलीज होईल.

कंगनाच्या हाती यावर्षी बरेचसे चित्रपट आहे. अश्विनी अय्यर तिवारी यांच्या ‘पंगा’ चित्रपटातही ती झळकणार आहे. हा चित्रपट कबड्डीवर आधारित आहे. याशिवाय ती जयललिता यांच्या बायोपिकमध्येही दिसणार आहे. सप्टेंबर महिन्यात या चित्रपटाचे शूटिंग सुरू होईल.

Leave a Comment