अखेर अर्जुनने दिली मलायकासोबतच्या नात्याची कबुली


सध्या अर्जुन कपूर आणि मलायका अरोरा यांच्या प्रेमाचे वारे बॉलिवूडमध्ये वाहु लागले आहेत. दोघांच्या नात्याची चर्चा बऱ्याच दिवसापासून सुरू होती. पण त्यांच्या नात्याची कबुली दोघांनीही माध्यमांसमोर दिली नव्हती. मलायकाने अलिकडेच अर्जुनच्या वाढदिवशी त्याच्यासोबतचा एक फोटो शेअर करून त्यांच्या नात्यावर शिक्कामोर्तब केले. तर, दुसरीकडे आता त्यांचे नाते अर्जुननेही ऑफिशियल केले आहे.

अर्जुन कपूरने एका माध्यमाच्या मुलाखतीत बोलताना त्यांच्या नात्याबद्दल बोलताना सांगितले, की सध्या त्यांचे नाते दोघेही एन्जॉय करत आहेत. त्यांचा एवढ्यात लग्नाचा काहीही प्लॅन नाही. त्यांना लग्नाचे प्रेशर घेऊन लग्न करायचे नाही, असे त्याने म्हटले आहे. सध्या आम्ही दोघेही एकमेकांसोबत कम्फरटेबल असल्याचेही त्याने म्हटले आहे.

मलायकानेही अर्जुनसोबतच्या नात्याबाबत प्रतिक्रिया दिली होती. ती म्हणाली होती, की हे तिचे वैयक्तिक आयुष्य आहे. वयाच्या अंतराचाही काही प्रभाव आपल्या नात्यावर होत नाही. अर्जुनने त्याचा वाढदिवस मलायकासोबत न्युयॉर्क येथे साजरा केला होता. त्यांचे काही फोटोदेखील त्यांनी सोशल मीडियावर शेअर केले आहेत.

Leave a Comment