डॉक्टरांनी महिलेच्या कानातून काढली जिवंत पाल


एक भलताच प्रकार थायलंडची राजधानी असलेल्या बँकॉकमध्ये समोर आला आहे. एका रुग्ण महिलेच्या कानातून तेथील स्थानिक डॉक्टर वरन्या नगांथावी यांनी चक्क जिवंत पाल बाहेर काढली आहे. पाल कानातून बाहेर काढल्यानंतर महिलेला होत असलेल्या वेदनांपासून आराम मिळाला. पण, महिलेची कानात पाल शिरल्याचे समजताच चांगलीच घाबरगुंडी उडाली होती. सोशल मीडियातून ही घटना व्हायरल झाली आहे.

घटनेबाबत अधिक माहिती अशी की, एक महिला डॉक्टरांकडे कानात खाज आणि प्रचंड वेदना होतात असल्याची तक्रार घेऊन गेली होती. डॉक्टरांनी महिलेचा त्रास जाऊन घेतल्यावर तिच्या कानाची बारकाईने तपासणी केली. प्रथमदर्शनी डॉक्टरांना महिलेच्या कानात काहीतरी अडकल्याचे ध्यानात आले. प्राथमिक उपचार डॉक्टरांनी करुन पाहिले. पण, विशेष फरक पडला नाही. पण महिलेचा त्रास कायम होता.

दरम्यान, काही प्रतिजैवके डॉक्टरांनी महिलेला देऊन पाहिली. महिलेच्या कानदुखी आणि वेदनेवर तरीही काही फरक न पडल्यामुळे डाक्टरांना शंका आली. ऑटोस्कोपद्वारे महिलेच्या कानाची डॉक्टरांनी तपासणी केली. या तपासणीत महिलेच्या कानात एक लांबडा किडा हालचाल करत असल्याचे दिसले.

विशिष्ट प्रकारचे उपकरण वापरुन डॉक्टरांनी तो कीडा अलगत बाहेर काढला. डॉक्टर, नर्स आणि पीडित महिलाही हा किडा पाहून आश्चर्यचकीत झाले. कानातून बाहेर काडलेला किडा हा किडा नव्हता तर, ती एक छोटी पाल होती. या पालीला डॉक्टर आणि नर्स लोक सुरुवातीला एक किडा समजत होते.

डॉ. वरन्या यांनी या घटनेबाबत एक फेसबुक पोस्ट शेअर करत सविस्तर माहिती दिली. आपल्या फेसबुक पोस्टमध्ये त्यांनी लिहिले आहे की, महिलेच्या कानातील पाल जिवंत होती. कानात ती हालचाल करत होती. ज्यामुळे महिलेला कानदुखी आणि वेदनेचा त्रास होत होता. डॉक्टरांनी दिलेल्या माहितीनुसार या पालीला जिंग जोक नावाने ओळखले जाते. ही पाल रुग्ण महिलेच्या कानात कशी घुसली याबाबत माहिती मिळू शकली नाही. सध्या ही महिला डॉक्टरांच्या निरिक्षणाखाली आहे.

Leave a Comment