पेप्सीकोच्या जाहिरातीत झळकणार 87 वर्षीय सुपर फॅन


विश्वचषक स्पर्धेतील भारत विरुद्ध बांगलादेश यांच्यात नुकत्याच झालेल्या सामन्यात एक 87 वर्षाच्या आजीबाई खूपच चर्चेत आल्या होत्या. या सामन्या दरम्यान चारुलत्ता पटेल यांनी टीम इंडियाचा कर्णधार विराट कोहली आणि सलामीवीर रोहित शर्मा याचे कौतूक केलेले फोटो सोशल मीडियात फारच व्हायरल झाले होते.

त्याच चारुलत्ता पटेल आता एका कंपनीच्या जाहिरातीचा भाग असणार आहेत. त्यांना पेप्सीको कंपनीने आपल्या जाहिरात कॅम्पेनमध्ये सहभागी केले आहे. चारूलता पटेल या पेप्सीको कंपनीच्या जाहिरातीमध्ये दिसणार असून, कंपनी त्यांना यंदाच्या विश्वचषकात एक ‘स्वॅग स्टार’ म्हणून दाखवणार आहे.

बांगलादेशच्या विरुद्ध खेळलेल्या गेलेल्या सामन्या दरम्यान चारुलत्ता या भारतीय संघाला प्रोत्साहन देण्यासाठी चक्क मैदानात पोहचल्या होत्या. त्यांचे त्यावेळेचे फोटो सोशल मीडियात व्हायरल झाले होते. पेप्सीकोचे विश्वचषकादरम्यान हॅशटॅग #HarGhoontMeinSwagHa असे जाहिरात कॅम्पेन सुरू आहे. आता त्यात चारूलता पटेल यांना घेतल्याने जाहिरात चांगलीच प्रसिध्द होण्याची शक्यता आहे.

पेप्सीकोच्या प्रवक्त्यांनी सांगितले की, खेळाच्या प्रती असलेले त्यांचे प्रेम दाखवते की, जीवनातील सुंदर अनुभव घेण्यासाठी वय अडथळे ठरत नाही. तसेच, या आजीबाईंनी ‘मी देवाकडे प्रार्थना केली असून, भारत यंदाचा विश्वचषक नक्की जिंकेल. मी संघाला नेहमीच आशिर्वाद देते, असे म्हटले आहे.

याशिवाय, भारताच्या पुढील सामन्यात चारूलता पटेल यांनी उपस्थित राहावे यासाठी त्यांच्या तिकीटांची व्यवस्था विराट कोहली करणार असल्याचे वृत्त होते. त्याचबरोबर उद्योगपती आनंद महिंद्रा यांनी देखील पुढील सामन्यांसाठी त्यांच्या तिकीटाची व्यवस्था करणार असल्याचे ट्विट केले होते.

Leave a Comment