मोदी 2.0 ; अर्थसंकल्पात काय महाग अन् काय स्वस्त झाले?


नवी दिल्लीः मोदी सरकारच्या दुसऱ्या टर्मचा अर्थसंकल्प केंद्रीय अर्थमंत्री निर्मला सीतारमण यांनी आज संसदेत सादर केला. शेतकरी आणि मध्यमवर्गीयांसाठी या अर्थसंकल्पातून दिलासादायक घोषणा करण्यात आल्या आहेत. घर खरेदीसाठी मिळत असलेली 2 लाखांची सूट 3.5 लाखांवर नेण्यात आली असून, 45 लाख रुपयांपर्यंत घर खरेदी करणाऱ्यांना याचा लाभ मिळणार आहे.

1 रुपयाने पेट्रोल आणि डिझेलचे भाव वाढणार असून, चालकांना त्याचा वाहन भुर्दंड पडणार आहे. तर सोने तसेच इतर धातूंवरील 10 ते 12.5 टक्क्यांपर्यंत सीमाशुल्क वाढवण्याची तरतूद करण्यात आली आहे. इलेक्ट्रीक कार खरेदी करणाऱ्यांनाही करात विशेष सूट देण्यात आली आहे. प्रदूषण कमी करण्यासाठी इलेक्ट्रिक वाहनांच्या खरेदीला चालना देण्याचा सरकारचा प्रयत्न असल्यामुळेच इलेक्ट्रिक वाहनांवरील 12 टक्के जीएसटी 5 टक्क्यांवर आणण्यात आला आहे. या वाहनांच्या खरेदीसाठी कर्ज घेतल्यास सरकारकडून सवलत देखील दिली जाणार आहे.

अर्थसंकल्पामुळे या वस्तू होणार महाग – परदेशी तेल, प्लास्टिक, रबर, पेपर छपाई, पुस्तकांची कव्हर आणि छपाई, ऑप्टिकल फायबरसाठी वापरले जाणारे वॉटर ब्लॉकिंग टेप्स, टाईल्सच्या वस्तू (सिरेमिक उत्पादने), स्टेनलेस स्टील, मिश्र धातूचं वायर, एसी, रस्ते बांधकामासाठीचे क्रशर मशिन, लाऊडस्पीकर, डिजिटल व्हिडीओ रेकॉर्डर, सीसीटीव्ही आणि आयपी कॅमेरा, ऑप्टिकल फायबर बंडल, ऑटोमोबाईल साहित्य, ऑटो पार्ट्स, सिंथेटिक रबर, पीवीसी, टाइल्‍स, इलेक्ट्रॉनिक वस्तू, सॉकेट, प्लग्स, सोने, सिगारेट, तंबाखू.

अर्थसंकल्पामुळे या वस्तू होणार स्वस्त – घर खरेदी, इलेक्ट्रिक कार, साबण, शॅम्पू, फोम, केसाचं तेलं, टूथपेस्‍ट, पंखा, लॅम्‍प, ब्रीफकेस, प्रवासी बॅग, सॅनिटरी वेअर, बोटल, कंटेनर, भांडी, गादी, बिछाना, चष्म्याची फ्रेम, फर्निचर, पास्‍ता, अगरबत्ती, नारळ, सॅनिटरी नॅपकिन, टेक्सटाईल वस्तू, केमिकल्स, कॉम्प्रेसर, युरेनियम, नावीन्यकरण ऊर्जेसाठी आवश्यक गोष्टी, वाहनातील चार्जर, लष्करी साहित्य.

Leave a Comment